शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

पाणीपुरी, दूषित आइसगोळा वाढवतो लहान मुलांचा ताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 11:36 AM

- अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : उन्हाळा आला की शीतपेय विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, बर्फाचा गोळा घेताना ...

- अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : उन्हाळा आला की शीतपेय विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत कुणालाच शंका येत नाही. उन्हाची काहिली शमविण्यासाठी बर्फाचा गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान-मोठ्यांची गर्दी पाहायला मिळते. परंतु बर्फगोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून बर्फ तयार करण्यात येतो. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी झाली आहे. पाणीपुरी देखील कुठेही मिळते, पण त्यातील पाणी, ते पदार्थ देणारे यांची स्वच्छता तेवढीच महत्त्वाची असते, अनेकदा डॉक्टर असे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत, असा सल्ला देतात.

पाणीपुरीतून गॅस्ट्रोचा धोका    अस्वच्छ पाणी : पाणीपुरीमध्ये पाण्याचे महत्त्व जास्त असून अस्वच्छ, घाण पाणी असेल तर ते पोटात जाऊन इन्फेक्शन होऊन व्यक्ती आजारी पडू शकते. त्यामुळे अस्वच्छ ठिकाणी, विशेषतः रस्त्यावरील गाड्यांवरील पाणीपुरी खाऊ नये, असे आवाहन महापालिका आरोग्य विभाग वारंवार करते.    हातांची अस्वच्छता : पाणीपुरी देणारी व्यक्ती तासन्तास हातगाड्यांवर उभी राहते. उन्हातान्हात असल्याने प्रचंड घाम येतो, त्या अवस्थेत ते लघवीला जातात, स्वच्छ पाण्याने हात धुतातच असे नाही, त्याच हाताने पाणीपुरी देतात, त्यामुळे आजार होऊ शकतो.

गोळ्यातला बर्फ कोणत्या पाण्याचा

रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोळा व आईस कॅन्डी तयार केली जाते. निम्न दर्जाचा रंग आणि सॅकरीनचा विक्रेते उपयोग करतात. बर्फगोळ्याच्या स्वरूपात आजार विकत आहोत, याची कल्पना विक्रेत्यांना असते. बर्फगोळे विक्रेत्यांच्या ठेल्यावर नेहमीच अस्वच्छता असते. त्यातच गोळा तयार करताना बर्फ लोखंडाच्या ब्लेडमधून किसला जातो. या ठेल्यावर बऱ्याचदा रासायनिक रंगाच्या बाटल्या उघड्यावर ठेवलेल्या असतात.बर्फाचा मूळ वापर रुग्णालयांमध्ये औषधांचा अथवा सलाईनचा साठा करण्यासाठी होतो. मच्छीमार याचा वापर मासे ताजे राहण्यासाठी करतात. बर्फाचा सर्वाधिक वापर हा रासायनिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये होतो. विक्रेते वापरलेल्या बर्फाची विक्री करतात. ते शरीरासाठी हानीकारक असते. कारखान्यातही बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो जास्त काळ टिकावा, यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. 

डॉक्टरांचे आवाहनअशुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फ आजाराला आमंत्रण देणारा आहे. त्यामुळे पोटाचे विकार, कावीळ, डायरिया आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. या आजारांचे प्रमाण उन्हाळ्यात अशुद्ध बर्फाचे सेवन केल्यामुळे वाढते. लग्नात बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. घरी येऊन पाणी प्यावे. रस्त्यावर बर्फमिश्रित रस आणि अन्य पदार्थ खाऊ नये.