शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पैंजणांनी उलगडला हत्येचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:39 AM

केरळमधून आरोपीला अटक : गुन्हे अन्वेषण विभागाला यश

डोंबिवली : एका अनोळखी महिलेच्या हत्येचे गूढ तिच्या पायातील पैंजणांच्या आधारे उलगडण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांना यश आले आहे. कोणताही पुरावा नसताना केलेल्या तपासानंतर पोलिसांनी आरोपी मन्सूर इसा अली शेख याला केरळमधील कोट्टायम येथून अटक केली आहे.आयरेगावातील कोपर-वसई रेल्वेट्रॅकजवळ २९ मे रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केला. आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडलेला नव्हता, पण त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी तिच्या पायातील चांदीचे पैंजण तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. पैंजणांवर तमिळ भाषेत ‘मलार’असे नाव लिहिले असल्याचे आढळले. इंटरनेटद्वारे तामिळनाडू राज्यातील ‘मलार’नामक ज्वेलर्स दुकानाची अचूक माहिती तपास पथकाकडून मिळवण्यात आली. यावर पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगून, शरद पंजे यांचे पथक तामिळनाडू राज्याकडे रवाना झाले. तपास पथकाने त्याठिकाणी जाऊ न मलार ज्वेलर्स दुकानाचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. दरम्यान, या ज्वेलर्समध्ये खरेदी करण्यासाठी मुस्लिम ग्राहक येत असल्याचे पथकाला समजले. त्यामुळे त्यांनी आसपासच्या शहरांतील मुस्लिम लोकवस्ती असलेले विभाग आणि खेड्यांमध्ये चौकशी सुरू केली. हत्या झालेल्या अनोळखी महिलेची ओळख पटवण्यासाठी तिच्या अंगावरील कपडे, पैंजण यांचा फोटो दाखवण्यास सुरुवात केली. यामध्ये पथकाला यश आले. येथील तिरुवन्नानमलाई राधापुरम या भागातील खलील शेख यांनी त्यांची पन्नासवर्षीय चुलत बहीण शाबिरा खान मुंबईतून १६ मेपासून बेपत्ता असल्याची माहिती पथकाला दिली. अखेर, अधिक चौकशीअंती अनोळखी मृत महिला ही शाबिरा खान असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिचा मोबाइल नंबर मिळवून त्याआधारे तपास केला असता शाबिरा कोपर रेल्वेस्टेशन येथे १४ आणि १६ मे रोजी आली असल्याचे आणि त्यानंतर तिचा मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. अधिक माहिती काढली असता तिच्या परिचयाचा मन्सुर इसा अली शेख हाही कोपर रेल्वेस्थानकात आला असल्याचे व त्यानंतर मोबाइल बंद करून तो निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यानेच ही हत्या केल्याचा संशय बळावल्याने त्याचा माग काढून त्याला केरळ येथील कोट्टायम येथून अटक करण्यात आली.नांदवण्याच्या आग्रहामुळे हत्याशाबिरा खान हिच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. त्यानंतर, तिने मन्सुरशी लग्न केले होते. मन्सुरचेही हे दुसरे लग्न होते. त्याची पहिली बायको जिवंत आहे. दरम्यान, शाबिरा ही मन्सुरला कोपर येथील घरात एकत्र नांदू, असा आग्रह करीत होती, पण ते मन्सुरला मंजूर नव्हते. ती हट्टालाच पेटल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलीस निरीक्षक जॉन यांनी सांगितले.