शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पप्पू कलानी समर्थकांचा आयलानींच्या घरासमोर ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:00 AM

टाउन हॉल येथे शनिवारी झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात माजी आमदार पप्पू कलानी यांचा दहशतवादी असा उल्लेख झाला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : टाउन हॉल येथे शनिवारी झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात माजी आमदार पप्पू कलानी यांचा दहशतवादी असा उल्लेख झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या प्रकाराने संतप्त झालेल्या शेकडो कलानी समर्थकांनी रविवारी जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कुमार आयलानी व राम वाधवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी कलानी समर्थकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.कलानी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा ओमी कलानी, कमलेश निकम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, पितू राजवानी यांच्यासह शेकडो कलानी समर्थकांनी निषेध व्यक्त केला. तसेच दुपारी आयलानी यांच्या घरासमोर एकत्र येत ठिय्या दिला. आयलानी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी आयलानी यांच्या घरासह पक्ष कार्यालयाला पोलीस संरक्षण दिले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काही कलानी सकर्थकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.सलग चार वेळा आमदारपदी निवडून आलेले कलानी यांना दहशतवादी म्हणणारे वाधवा व आयलानी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन ओमी टीमचे संतोष पांडे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिले. या प्रकाराने आयलानी-कलानी आमनेसामने आले असून राजकीय वातावरण तापले आहे. वाधवा यांच्यावर तीन दिवसांत कारवाई केली नाहीतर चेहऱ्याला काळे फासण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे.दरम्यान, शनिवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एकेकाळी कट्टर कलानी समर्थक असलेले माजी उपमहापौर विनोद तलरेजा, माजी नगरसेवक गणपत ऐडके, पृथ्वी वलेच्छा, व्यापारी संघटनेचे नरेश दुर्गांनी, पप्पू बहरानी यांच्यासह अनेकांना प्रवेश दिला.>चौकशीनंतर कारवाई करण्याचे आश्वासनओमी टीमच्या निवेदनावरून कारवाई करण्याचे संकेत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी दिले. कलानी समर्थकांनी ठिय्या केल्यावर ताब्यात घेतल्याचे सुराडकर यांनी सांगितले. तर, झालेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, असे कुमार आयलानी यांनी सांगितले.