ठाणे: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर से महाराष्ट्र या दरम्यान भारत जोडो न्याय यात्रा आयोजित केली आहे. ही न्याय यात्रा ठाणे ग्रामीण जिल्हा हद्दीत १५ मार्च रोजी प्रवेश करणार आहे. ते सोनाळे, ता. भिवंडी येथे मुक्कामी थांबणार आहे. १६ मार्च रोजी ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत ही यात्रा येणार आहे.
त्यांना झेड प्लस सुरक्षा वर्गवारी आहे. त्यानुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांचे ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात प्रवेश निर्गमित होईपर्यंत नागरिकांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी थांबणाऱ्या ठिकाणी अंबाडी नाका परिसर, महापोली गाव परिसर, शेलार हनुमान मंदीर परिसर, नदीनाका शेलार तसेच रात्री मुक्कामाच्या ठिकाणी मौजे सोनाळे मैदान परिसरात यातायात होऊ नये, याकरिता या पॅराशूट ग्लायडिंग करण्यास तसेच ड्रोन उडविण्यास बंदी करण्यांत आली आहे. या पार्श्वभूमीवर व ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे