ठाणे - ५४व्या कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणेच्या पराग बदिरके याने पटकावले. तर, कनिष्ठ गटात मुंबईतील रुईया महाविद्यालयाच्या सिध्दी मयेकर हिने बाजी मारली. ५४व्या कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा रविवारी पार पडला.
ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कनिष्ठ आणि पदवी गटात मिळून ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात ठाणे, मुंबईसह चिपळूण, नाशिक, पुणे, उस्मानाबाद येथील स्पर्धकांचा समावेश होता. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजीव लाटकर म्हणाले की, कोणतेही कौशल्य हे तांत्रिक असू नये, ते ह्रदयाला स्पर्श करणारे हवे. हाच नियम वक्तृत्वालाही लागू आहे असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनी ही स्पर्धा प्रत्यक्ष घेण्यात आली. नियोजित व उत्स्फूर्त अशी दोन प्रकारची भाषणे करणाऱ्या स्पर्धकांचे परिक्षण डॉ. निलांबरी कुलकर्णी, डॉ. केतन भोसले, डॉ. मानसी केळकर आणि वरुण सुखराज यांनी केले. त्यांचा परिचय समिती सदस्य डॉ. राजश्री जोशी यांनी करून दिला. तर, त्यांचा सत्कार मंडळाचे विश्वस्त निशिकांत साठे आणि सरचिटणीस सविता कळके यांनी केला. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक श्री समर्थ सेवक मंडळाचे अध्यक्ष संजीव हजारे यांनी केले तर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष व स्पर्धा समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी केले. लाटकर यांचे स्वागत कायर्कारी विश्वस्त उल्हास प्रधान यांनी केले. पारितोषिकांची घोषणा समिती सदस्य पौर्णिमा जोशी व योगेश भालेराव यांनी केली.
स्पर्धेचा निकाल -
पदवी गटप्रथम क्रमांक - पराग राजेंद्र बदिरके, यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणेद्वितीय क्रमांक - वृषभ चौधरी, इग्नू, नाशिकतृतीय क्रमांक - यश रवींद्र पाटील, बिर्ला महाविद्यालय, कल्याणउत्तेजनार्थ - प्रतिक्षा परशूराम गायकवाड, कीर्ती महाविद्यालय, मुंबई
विशेष पारितोषिकनियोजित - पराग राजेंद्र बदिरके, यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणेउत्स्फूर्त - वृषभ चौधरी, इग्नू, नाशिक
कनिष्ठ गट
प्रथम क्रमांक - सिध्दी नागेश मयेकर, रुईया महाविद्यालय, मुंबईद्वितीय क्रमांक - आभा भोसले, रुईया महाविद्यालय, मुंबईतृतीय क्रमांक - सृष्टी विक्रांत शिंदे, डी.बी.जे महाविद्यालय, चिपळूणउत्तेजनार्थ - स्वरा दीपक पाटील, रुईया महाविद्यालय, मुंबई
विशेष पारितोषिकनियोजित / उत्स्फूर्त - सिध्दी नागेश मयेकर, रुईया महाविद्यालय, मुंबई