शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

परमवीर सिंग खंडणी प्रकरण; तपास आता सीबीआय करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:08 PM

Parambir Singh: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग झाला.

ठाणे : बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना, क्रिकेट बुकी सोनू जलान आणि रियाज भाटी यांच्याकडून साडेतीन कोटींची कथित खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग झाला. गुरुवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्याकडे घेतला. 

सिंग यांच्याविरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गोरेगाव, अकोला आणि ठाणे येथील कोपरी आणि ठाणेनगर या  पोलिस ठाण्यांमध्ये असे एकूण पाच वेगवेगळे गुन्हे (एफआयआर) दाखल झाले आहेत. आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी संरक्षण द्यावे, अशी मागणी सिंग यांनी केली होती. त्यानुसार दि. २४ मार्च २०२२ रोजी या प्रकरणाचा निकाल देतेवेळी सिंग यांच्या विरोधातील पाचही एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आतापर्यंत मरिन ड्राइव्ह, गोरेगाव,  अकोला आणि ठाण्यातील कोपरी  या चार ठिकाणांचे एफआयआर सीबीआयकडे वर्ग झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशनुसार, ठाणे नगर पोलिस ठाण्यातील एफआयआरदेखील आता सीबीआयकडे वर्ग झाला. प्रक्रियेनुसार सीबीआयने ठाणेनगर पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे स्वत:चा एफआयआर नोंदविली असून, याप्रकरणी पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय आहे ठाणेनगरचे प्रकरण?केतन तन्ना यांच्यासह तिघांनी  ठाणेनगर पोलिस ठाण्यात ३० जुलै २०२१ रोजी याबाबतची तक्रार दिली होती. सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच एन्काउंटर स्पेशालिस्ट  प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा जबाब  तन्ना यांनी नोंदवला होता.कुख्यात गुंड रवि पुजारी याचेही नाव होते. परमबीर  आणि इतर जणांवर जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यांसारख्या दहाहून अधिक कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात ठाणे न्यायालयाने परमवीर सिंग यांना अटक वॉरंटही काढले होते. अखेर ते या प्रकरणात न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगCBIगुन्हा अन्वेषण विभाग