शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

शरद पवार गटातील यादीत अजित पवार गटाची नावे, परांजपे यांनी केला दावा

By अजित मांडके | Published: October 23, 2023 5:22 PM

दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणी जाहीर झाली होती.

ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाने जी कार्यकारणीची यादी जाहीर केली. त्यातील काही नावे ही अजित पवार गटाची असल्याचा दावा आता शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा दोनही गट आमने सामने येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून यादी सादर केली गेली मात्र त्या यादीवरुनच आता परांजपे यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यात सोमवारी परांजपे यांनी  ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे तत्कालिन उपाध्यक्ष शशिधर जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी तर सुनील पाटील यांची ठाणे शहर (जिल्हा) चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव उपस्थित होते.

दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणी जाहीर झाली होती. यात अनेक नवीन जुन्या चेहºयांना संधी देत भरगच्च यादी जाहीर झाली होती. परंतु या यादीवरच अजित पवार गटाने बोट ठेवले आहे. यादीत ज्या पदाधिकाºयांना पदे देण्यात आली आहेत. त्यातील काही पदाधिकारी हे अजित पवार गटात आधीच सहभागी झाले असून त्यांना महत्वाची पदेही देण्यात आल्याचा दावा शहर अध्यक्ष परांजपे यांनी केला आहे. त्यामुळे किमान आपल्या गटात कोण कोणते पदाधिकारी आहेत, याची तरी माहिती घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

परांजपे यांनी केलेल्या दाव्यामुळे पदाधिकारी देखील आता संभ्रमीत झाले आहेत. त्यातही कोण कुठे हे अद्यापही चित्र स्पष्ट झाले नसल्याचेच दिसत आहे. राष्टÑवादी दोन गटात विभागल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते हे आजही संभ्रमात आहेत, कधी इकडे तर कधी तिकडे अशा द्विधा मनस्थीत ते असल्याचे दिसत आहेत. त्यांनाही दोन गट झाल्याचे पचनी पडलेले नाही. परंतु असे असतांना सर्वांना आपलेसे करण्यासाठी आधी अजित पवार गटाने आॅगस्ट महिन्यात कार्यकारणी जाहीर केली होती. त्यात अनेकांना संधी दिली होती, त्यानंतर दोन दिवसापूर्वी जाहीर झालेल्या शरद पवार गटानेही आपली भरगच्च यादी जाहीर केली आहे. परंतु त्यात अजित पवार गटाचे चार ते पाच चेहरे दिसल्याचा दावा परांजपे यांनी केला आहे. हे पदाधिकारी आधी पासूनच आपल्या सोबत आहेत, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या पदांवरुन आता पुन्हा शरद पवार व अजित पवार गट आमने सामने येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार