ठाणे : मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आतापर्यंत तीन हजार ५९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश केजी ते पहिलीच्या वर्गात झाले. मात्र, निवड झालेल्या उर्वरित दोन हजार २९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश त्यांच्या पालकांच्या निष्काळजीपणामुळे आरटीईचे शालेय प्रवेश रखडले आहेत. त्यास अधिक विलंब न करता ४ मे पर्यंत या बालकांचे प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील ६५२ शाळांमधील प्रवेशासाठी आरटीईद्वारे पाच हजार ८९६ बालकांची निवड पहिल्या फेरीत झाली आहे. यातील तीन हजार ५९७ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, पालकांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे दोन हजार २९७ शालेय प्रवेश रखडले आहेत. या प्रवेशासाठी आता ४ मे ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित पालकांनी त्यांना दिलेल्या शाळांमध्ये त्यांच्या बालकांचे केजी ते पहिलीच्या वर्गात त्वरित प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.
एससी, एसटी प्रवर्गांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांमधील बालकांना शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ६५२ खाजगी शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश आरटीई कायद्याखाली आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी केजी ते पहिलीच्या वर्गांसाठी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत.त्यातून लॉटरी सोडतीच्या पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली आहे.
652 शाळांमधील प्रवेशासाठी आरटीईद्वारे पाच हजार ८९६ बालकांची निवड पहिल्या फेरीत झाली आहे. यातील तीन हजार ५९७ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, पालकांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे दोन हजार २९७ शालेय प्रवेश रखडले आहेत. पालकांच्या निष्काळजीमुळे रखडलेले बालकांचे प्रवेश
शहराचे नाव रखडलेले प्रवेशअंबरनाथ १७९भिवंडी मनपा २०५भिवंडी ३४कल्याण ८३कल्याण-डोंबिवली मनपा २५५मीरा-भाईंदर ०२४मुरबाड ००८नवी मुंबई ७१७शहापूर ११३ठाणे मनपा-१ २३३ठाणे मनपा-२ ३७१उल्हासनगर ०७५