ठाणे - ठाणे महापालिकेच्या सावरकर नगर भागातील शाळा क्रमांक १०३ मधील इंग्रजी माध्यमाच्या ज्युनिअर, सीनिअरच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना विश्वासात न घेता, येथील सुमारे १०८ विद्यार्थ्यांचे स्थलातंर करण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत शिक्षण विभागाशी चर्चा करुनही त्यांनी आपली भुमिका न बदल्याने अखेर शुक्रवारी संतप्त पालक आणि त्यांच्या पाल्यांनी महापालिकेवर धरणे आंदोलन केले. याचे नेतृत्व आम आदमी पार्टी आणि ठाणे मतदाता जागरण अभियानने केले होते. यावेळी कोणत्याही परिस्थिती मुलांचे स्थलांतर होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला. सावरकर नगर येथील ठाणे महापालिकेची इंग्रजी शाळेतील पूर्व प्राथमिक वर्ग हे खाजगी संस्थेला सुरु करण्यासाठी दिले आहेत. परंतु शिक्षण समितीचा हा डाव आम्ही हाणून पाडू असा इशारा देत शाळा बचाव - पालक करणार रस्त्यावर आंदोलन केले जाईल असा इशारा पालकांनी यापूर्वी दिला होता. परंतु शिक्षण विभागाने आपला हट्ट न सोडल्याने अखेर शुक्रवारी पूर्व प्राथमिकचे सर्व लहान विद्यार्थी महापालिका मुख्यालयावर धरणे आंदोलनाला बसले होते. नवीन वर्ग तयार झाल्याशिवाय मुलांना हलविले जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने कबुल केले होते. परंतु त्या आधीच विद्यार्थ्यांना स्थलांतरीत करण्याचा घाट घातला जात आहे. त्यांच्या शाळेचे वर्ग खाजगी संस्थेला चालविण्यासाठी दिले जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही शाळा इमारत खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय रद्द करावा, लहान मुलांचे स्थलांतर करु नये आणि त्यांना सुरक्षित जागेतून धोकादायक व अडचणीच्या जागेत पाठवू नये अशी यावेळी मागणी करण्यात आली.
चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालक धडकले पालिकेवर, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे स्थलांतर होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 2:20 PM
वारंवार मागणी करुनही विद्यार्थ्यांचे स्थलांतर सुरुच ठेवल्याने शुक्रवारी संतप्त झालेल्या पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
ठळक मुद्देखाजगी संस्थेला शाळा देण्याचा निर्णय रद्द करावाविद्यार्थ्यांना धोकादायक जागेत टाकू नये