शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बेकायदा फीविरोधात पालकांचा मोर्चा; अंबरनाथमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:06 PM

अधिकाऱ्यांची ठोकळेबाज उत्तरे

अंबरनाथ : अंबरनाथमधील तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान असतानाही त्या शाळा बेकायदा फी आकारत आहेत. या फीविरोधात तीन शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी बुधवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, मोर्चेकºयांसोबत चर्चा करताना अधिकाºयांची उत्तरेही पालकांना निराश करणारी होती. बेकायदा फी आकारणाºयांवर कारवाई करण्याऐवजी त्यांचा अहवाल पाठवू, असे मोघम उत्तर देत आपली जबाबदारी झटकण्याचे काम अधिकारी करत होते.अंबरनाथ शहरातील तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान असतानाही या शाळा पालकांकडून फी आकारत आहेत. यासंदर्भात गटशिक्षणाधिकाºयांनी १० जून रोजी आदेश काढून अनुदानित शाळेने फी आकारू नये, असे निर्देश दिले. मात्र, असे असतानाही शाळांनी फीआकारणी बंद केली नाही. या तिन्ही शाळा पालकांना फी भरण्याची सक्ती करत आहेत. फी न भरणाºया पालकांच्या पाल्यांना पुस्तके दिली जात नाही. त्यामुळे पालकांची चांगलीच कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी तिन्ही शाळांतील पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. दोनशेहून अधिक पालक या मोर्चात सहभागी झाले होते.पालकांच्या शिष्टमंडळाने अधिकाºयांशी चर्चा करताना आपल्या समस्या मांडल्या. मात्र, या समस्यांवर तोडगा न काढता केवळ सावध भूमिका घेण्याचे काम अधिकाºयांनी केले. बेकायदा फी घेणाºया शाळांवर कारवाईची मागणी पालक करत असताना त्या शाळांवर आम्ही कारवाई करू शकत नाही, असे उत्तर अधिकारी देत होते. तसेच यासंदर्भातील अहवाल तयार करून तो अहवाल पाठवू, इतकेच उत्तर अधिकारी देत होते. अखेर, काही पालकांनी ठोस भूमिका घेतल्यावर यासंदर्भात कारवाईचे संकेत अधिकाºयांनी दिले. त्यांच्या उत्तरानंतर मोर्चाची सांगता झाली.

टॅग्स :Schoolशाळा