शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: राज्यात एक दिवसाचा दुखवटा; NCPA मध्ये घेता येणार रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
2
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्चा देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
3
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
4
"मोदी महान आहेत, ते वडिलांसारखे दिसतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
5
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
6
Ratan Tata News : "थँक यू फॉर..." आणि 'ती' ठरली रतन टाटांची अखेरची पोस्ट
7
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
8
"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?
9
Ratan Tata : दानशूर! त्सुनामी असो किंवा कोरोनाचा उद्रेक... प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर
10
"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट
11
"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट
12
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
13
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
14
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
15
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
16
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
17
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
18
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
19
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
20
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर

खाजगी शाळांच्या मनमानी फी वसूली विरुद्ध पालक उतरले रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 7:50 PM

 मीरा भाईंदर मधील पालकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे

मीरारोड - कोरोना संसर्गा मुळे आधीच आमच्या नोकऱ्या - व्यवसाय बंद असल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे . शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिकवण्याच्या आड पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापना कडून गलेलठ्ठ फी साठी तगादा लावून आमच्या मुलांना व आम्हाला वेठीस धरून छळ केला जात आहे . येथील लोकप्रतिनिधी - अधिकारी यांना सांगून देखील न्याय मिळत नसल्याने आता तुम्हीच शेवटचा आधार आहेत असे साकडे मीरा भाईंदर मधील पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे . 

मीरा भाईंदर मधील विविध मोठ्या खाजगी शाळांच्या पालकांनी आज सोमवरो शाळांच्या बाहेर जमून आपला संताप व्यक्त केला . कोरोना संकटा मुळे आमच्या नोकऱ्या गेल्या , व्यवसाय ठप्प झाला आहे . आमची अक्षरशः होरपळ चालली आहे . या आधी आम्ही या शाळांनी मागितल्या तेवढ्या लाख लाख रुपयांच्या फी भरल्या आहेत . पण आता फी भरणे अशक्य झालेले आहे . शाळांनी तर लेट फी सुद्धा आकारली आहे . 

आम्हा पालकांना विविध प्रकारे घाबरवले जातेय . ज्यांनी फी भरली त्यांच्या साठी ऑनलाईन वर्ग सुरु केले . परीक्षा घेतल्या जात आहेत . ज्यांना फी भरता आली नाही त्यांच्या मुलांना ओलनलाईन शिक्षण नाही व परीक्षा देखील नाही . दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील फी न भरल्याने अभ्यास बंद केला आहे . काही शाळा तर पालकां कडून हमीपत्र लिहून घेत आहेत . काही शाळा तर अजूनही कॅंटीन फी , मिसलेनियस शुल्क अजूनही आकारत आहेत . ज्या पालकांनी फी कमी करा म्हणून शाळांना ईमेल केला त्यांना शाळेच्या वकीला मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहे . 

शाळांनी त्यांचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे . ऑनलाईन शिकण्यासाठी आमची मुलं घरातूनच अभ्यास करणार व त्यांचा त्यासाठी लागणारा सर्व खर्च देखील पालकच करणार आहेत . शाळा बंद आहेत पण तरी देखील शाळेचे व्यवस्थापन मात्र संपूर्ण वर्षाची आणि पूर्वी प्रमाणेच फी भरण्याचा तगादा लावत आहे . 

आम्ही स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , महापौर ज्योत्स्ना हसनाळे , शिक्षणअधिकारी उर्मिला पारधी , पालिका आयुक्त व अधिकारी आदीं कडे तक्रारी केल्या , गाऱ्हाणी मांडली . पण कोणी दाद दिली नाही . पारधी यांनी तर तुम्ही आणि तुमची शाळा काय ते बघून घ्या असे सांगून उत्तर दिले . 

अश्या बिकट परिस्थिती मध्ये आता मुख्यमंत्री तुमचाच शेवटचा आधार आहे . आम्हाला व आमच्या मुलांना वाचवा . त्यांना शिक्षणा पासून वंचित होऊ देऊ नका असे साकडे या पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे . शाळांची सरसकट ५० टक्के फी कमी करा . फी भरली नाही म्हणून मुलांचे शिक्षण थांबवू नका अशी विनंती पालकांनी केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरSchoolशाळा