शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
2
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
3
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
4
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
5
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
6
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
7
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
8
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
9
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
10
महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं
11
किती तो लाड! सोशल मीडियावरील 'त्या' मंडळींना टोला हाणत गंभीर झाला KL राहुलची 'ढाल'
12
Video: प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांना दिलं 'पखवाज-घुंगरु' चॅलेंज, बघा कोण जिंकलं?
13
पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?
14
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
15
"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   
16
छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
17
“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम
18
आधी 'लाडकी बहीण'विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केली होती याचिका,आता मागितली सुरक्षा; नेमकं प्रकरण काय?
19
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
20
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

ठाणे खाडीच्या प्रदूषणमुक्तीची परिक्रमा

By admin | Published: August 17, 2016 2:49 AM

चेंदणी कोळीवाड्यात पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जाण्याचे यंदाचे १५ वे वर्ष असून चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंच व चेंदणी कोळीवाडा

ठाणे : चेंदणी कोळीवाड्यात पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जाण्याचे यंदाचे १५ वे वर्ष असून चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंच व चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट यांच्यावतीने ठाणे खाडीतून मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू व्हावी यासाठी ठाणे खाडीची परिक्रमा करण्याचा संकल्प केला जाणार आहे. ही योजना वर्षभर राबविली जाणार आहे. चेंदणी कोळीवाड्यात पूर्वापार नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात आहे. परंतु ठाणे खाडीतील वाढते प्रदूषण आणि त्यामुळे नष्ट होत गेलेली मासेमारी यामुळे हा उत्सव साजरा करण्याची परंपरा खंडीत झाली. हा व्यवसाय पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने खंडीत पडलेली परंपरा १५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. ती आजतागायत सुरू आहे. बुधवारी चेंदणी कोळीवाड्याच्या या उत्सवाला १५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने चेंदणी कोळीवाड्यातील कोळीबांधव अभिनव संकल्प करणार आहेत. बुधवारी वाजत गाजत, ब्रास बॅण्डसह चेंदणी कोळीवाड्यातून मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी पूर्व-पश्चिम चेंदणी कोळीवाड्यातील कोळी बांधव-भगिनी ‘सण आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनवेचा...’ असे म्हणत मोठ्या उत्साहाने या मिरवणूकीत सहभागी होणार आहेत. सायं. ५ वा. निघणारी ही मिरवणूक पूर्व- पश्चिम चेंदणी कोळीवाड्यातून फिरुन कस्टम जेटीजवळ येणार आहे. मिरवणुकीत असणाऱ्या पालखीत सोन्याचा वर्ख लावलेला नारळ ठेवला जाणार आहे. कस्टम जेटीजवळ आल्यावर नवदाम्पत्यांच्या हस्ते हा नारळ अर्पण करुन पूजा केली जाणार आहे. या मिरवणूकीत कोळी नृत्य देखील सादर केली जाणार आहे. कोळी संस्कृतीचे पारंपारिक दर्शन ठाणेकरांना या उत्सवाच्या निमित्ताने बुधवारी घडणार आहे. (प्रतिनिधी)