उल्हासनगर : महिला दिनाचे औचित्य साधून आयुक्त अजीज शेख यांच्या संकल्पनेतून व कॉंग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांच्या प्रयत्नाने कॅम्प नं-५ येथे महिला उद्यानाचे उदघाटन जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आयुक्तांच्या हस्ते उदघाटन झाले. शहरातील महिलेच महिला उद्यान असून याठिकाणी सर्व सुखसुविधा पुरविण्याचे संकेत आयुक्त शेख यांनी दिले.
उल्हासनगर महापालिकेने मुख्यालय सभागृहात जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच महिलांच्या विरंगुळासाठी विशेष महिला उद्यान विकसित केले असून काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे यांनी त्यासाठी महापालिका आयुक्तांकडे सतत पाठपुरावा केला. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महिला व बाल उद्यानाचे उदघाटन आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुक्त सहपत्नीक उपस्थिती होती. माजी महापौर लीलाबाई आशान, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, महिला अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी, अलका पवार, वैधकीय अधिकारी डॉ अनिता सपकाळ यांच्यासह मोठया संख्येने महिला हजर होत्या.
विशेष महिला उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमांनंतर उपस्थित सर्व महिलांना तुळशीचे रोप व सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक भेट आयुक्त अजीज शेख व काँग्रेस गटनेत्या अंजली साळवे यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच प्रभाग क्रं-१८ मधील महिला वर्ग, महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना साडी देऊन सत्कार करण्यात आला. उद्यानाचे देखभाल करणाऱ्या महिलांना देखील साडी देऊन सत्कार केला गेला. उद्यानात सर्व जिमचे साहित्य व लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आले आहे. उद्यानाच्या भितींवर ऐतिहासिक कर्तुत्व गाजवणाऱ्या महिलांचे फोटो रंगवण्यात आले आहेत व महिला शक्ति संबंधित सुविचार लिहिण्यात आले आहेत. इथे लवकरच एक महिला भवन व शौचालय बनविण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका अंजली साळवे यांनी दिली आहे.