शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Bhayander: भाईंदरमध्ये ४० वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, एका व्यक्तीचा मृत्यू, ४ जखमी

By धीरज परब | Published: July 20, 2023 2:12 PM

Mira Bhayander: भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटर समोरील नवकीर्ती  या ४० वर्ष जुनी इमारतीचा काही तुटला असून त्यात चार जण जखमी झाले आहेत.

- धीरज परबभाईंदर - भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटर समोरील नवकीर्ती  या ४० वर्ष जुनी इमारतीचा काही तुटला असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. त्यात एकाचा पाय तुटला असल्याची माहिती बचाव कार्यास आलेल्या अग्निशमन विभागाने दिली आहे. तर सदरील इमारतीला पालिकेने १२ दिवस अगोदरच धोकादायक घोषित केले आहे. जखमी मध्ये इंद्रजित शर्मा वय ४८, जॉर्ज फर्नांडिस वय ५५, हरिशंकर मौर्या वय ५५ अबिद अली वय २२ यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालय भाईंदर येथे दाखल करण्यात आहे. त्यासोबतच एक रिक्षा व एक ऍक्टिव्हा यांचे नुकसान झाले असून, त्यासोबतच ऑर्केस्ट्रा बारच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहेत.

भाईंदर येथील सदरील इमारती स्ट्रक्चर ऑडिट ( इमारत सरंचना अहवाल ) सोसायटी वाल्यांनी केले होते व ते पालिकेत जमा करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेचे प्रभाग अधिकारी व इंजिनिअर येऊन त्यांनी येऊन पाहणी करून सदरील इमारती स्ट्रक्चर ऑडिट पुन्हा करण्याचे सांगितले.  त्यानंतरतो अहवाल यावरून त्यास धोकादायक ठरवून ती इमारत १२ जुलै पर्यंत खाली करण्याचे आदेश दिले होते. मात्र सदरील इमारतीमध्ये ऑर्केस्ट्रा बार व परमिट रूम बार असल्याने ते खाली करण्यात आले नव्हते. सोसायटीमधील एकूण ३६ सदनिका धारकांनी सदनिका खाली केल्या होत्या. तसेच फक्त १६ व्यावसायिक गाळ्यात व्यवसाय सुरू होता. सकाळी सकाळी सदरील इमारतीचा भाग कोसळून पडल्याने ही घटना घडल्याने कोणतीही मोठी हानी झाली नाही आहे.

पालिकेकडून सदर इमारत धोकादायक म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आली होती. सदर इमारत यापूर्वीच खाली करण्यात आली असून,रहिवास व्याप्त नव्हती फक्त तळमजला येथे दुकाने सुरु होती. या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांसह घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाची ३ वाहने, १ रेस्क्यू व्हॅन तसेच अग्निशमन जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे असे मिळून ५४ अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. सदरील इमारतीमध्ये १६गाळे, ३२ सदनिका आहेत. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांमध्ये तीन पादचारी व एक रिक्षाचालक आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच  आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त मनोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड आणि पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरAccidentअपघात