ठाणे : व्यावसायिक वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला ठाणे जिल्हा ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक सेवा संघाने पाठिंबा दर्शवला. या संपामुळे जिल्ह्यातील ३० ते ३५ व्यावसायिक वाहने शुक्रवारी बंद ठेवली होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वाहतूकदारांच्या स्थानिक पातळीवरील मागण्यांचे निवेदन संघाने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.मुंब्रा बायपास पुलाचे व रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करा. वाहतूकदारांना टेस्टिंग ट्रॅक उपलब्ध करून देण्यात यावे, या व आदी मागण्यांचे निवेदन संघाने ठाणे जिल्हाधिकाºयांना दिले. या संपात जिल्ह्यातील व्यावसायिक वाहतूकदार वाहने बंद ठेवून सहभागी झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिले.
जिल्ह्यातील ३५ हजार वाहतूकदारांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:56 AM