ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या ३७९ व्या अभिनय कट्ट्याच प्रमुख आकर्षण होत संदेश कुलकर्णी लिखित "पार्टनर्स" एकांकिकेच सादरीकरण करण्यात आले.
सर्वप्रथम अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी एकपात्री व द्विपात्रीचे सादरीकरण केले. त्यामध्ये विश्वजित वाघ याने "समझने कि कोशिश करो", अभिषेक निगम याने "Need to Be Stop", शिल्पा लाडवंते हिने 'पॉलीसी", सहदेव कोळंबकर याने "तो मी नव्हेच " व शुभांगी गजरे हिने "आम्ही दोघ राजाराणी" या नाटकातील एक प्रवेश सादर केला. त्याचबरोबर परेश दळवी व सहदेव साळकर याने " पप्पू पास हो गया" या द्विपात्रीचे सादरीकरण केले. त्यानंतर कट्ट्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या संदेश कुलकर्णी लिखित व अभिषेक सावळकर दिग्दर्शित " पार्टनर्स " एकांकिकेच सादरीकरण करण्यात आले. कॉलेज लाईफ मध्ये बऱ्याच आठवणी चा साठा तयार होतो , आणि त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे हॉस्टेल मधील रूम पार्टनर्स, रक्ताच्या नात्या पलीकडे जाऊन घट्ट बंध तयार झालेल्या तीन मैत्रिणींची गोष्ट म्हणजे पार्टनर्स एकांकिका . हसत खेळत सुरु होणारी एकांकिका प्रेक्षकांना विनयभंगा सारख्या गंभीर विषयावर घेऊन जाते . शेवटी स्त्रीयांनी आपल्या सुरक्षेसाठी कुणावर अवलंबून न राहता स्वतः परिस्थितीशी लढावं तरच अन्याय थांबेल असा बोध सर्वांना या एकांकिकेतून देण्याचा प्रयत्न टीम ने केला . वृषाली , माधवी , प्रियांका अशा या तीन मैत्रिणीं ची भूमिका साकारली ती म्हणजे वीणा छत्रे , श्रावणी कदम आणि शिवानी देशमुख यांनी. तसेच या एकांकिकेचे संगीत संयोजन कुंदन भोसले, नेपथ्याची धुरा सांभाळली सहदेव साळकर ,सहदेव कोळम्बकर, परेश दळवी यांनी . या सगळ्या टीम ला मार्गदर्शन लाभले ते संस्थापक किरण नाकती यांचे . हसू आणि आसू अश्या वेगवेगळ्या छटा असणाऱ्या एकांकिकेला प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून दाद दिली. तसेच संपूर्ण कट्ट्याचे निवेदन रोहिणी थोरात, हर्षदा शिंपी व न्यूतन लंके यांनी केले.