शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

परुळेकरचा आयुष वर्तक चमकला

By admin | Published: May 11, 2016 1:40 AM

एम. जी. परुळेकर शाळेचा विद्यार्थी आयुष वर्तक याची नुकत्याच झालेल्या निवड चाचणीतून १२ वर्षा खालील खेळाडूंच्या संभाव्य क्रि केट संघाच्या प्रशिक्षण शिबिरा साठी निवड झाली

वसई : एम. जी. परुळेकर शाळेचा विद्यार्थी आयुष वर्तक याची नुकत्याच झालेल्या निवड चाचणीतून १२ वर्षा खालील खेळाडूंच्या संभाव्य क्रि केट संघाच्या प्रशिक्षण शिबिरा साठी निवड झाली, मागील २ वर्षा पासून तो साईनाथ क्रि केट अ‍ॅकॅडमी व ज्युवे स्पोर्टÞ्स आणि प्रशिक्षक किरण जुवेकर सर, नरेश दळवी सर, पागधरे सर, विवेक कदम सर यांच्या मार्गदर्शना खाली सराव करत आहे, उजव्या हाताने फलंदाजी करणारा आयुष क्षेत्ररक्षणही चांगले करतो तसेच उजव्या हाताने आॅफ स्पीन गोलंदाजी करतो.एम सी .ए. तर्फे वरील निवडचाचणी अंतर्गत फेब्रुवारी २०१६ मध्ये संपूर्ण मुंबई विभागातून एकूण २४ संघांची नॉक आऊट स्पर्धा खेळवली गेली. त्या स्पर्धेसाठी मिरारोड ते विरार विभागातून जवळ जवळ २०० मुलामधून एक संघ निवडला होता व त्या संघात अयुषची केवळ निवडच झाली असे नाही तर त्याच्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली.डी. वाय.पाटील (नवी मुंबई) सारख्या प्रतिथयश अनुभवी संघाशी लढताना मर्यादित २५ षटकात अयुषने एकबाजू शेवटपर्यंत लावून धरत नाबाद ५५ धावा फटकावल्या, त्या खणखणीत सात चौकारांच्या आतषबाजीने. आपल्या नवोदित सहकाऱ्यांबरोबर भागीदारी करत संघाला १८० धावांची सुस्थिति प्राप्त करून देतांना व शेवटपर्यंत चिकाटीने झुंजतांना एम. सी. ए . मान्यताप्राप्त स्पर्धेत आपले पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर क्षेत्ररक्षण व गोलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी करून संघास विजय प्राप्त करून दिला. त्यानंतर प्रबोधिनी गोरेगाव संघास चारी मुंड्या चीत केले व त्यानंतर दिलीप वेंगसरकर अ‍ॅकॅडमीला टाय अवस्थेत रोखले ते २१ वे षटक स्वत: टाकून. त्या षटकात त्याने २ बळी मिळवले व सामन्यात रंगत निर्माण केली. शेवटी शेवटच्या २५ व्या निर्णायक षटकात स्वत: टिचून गोलंदाजी करून फलंदाजांना रोखले. (वार्ताहर)