शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

परवाना परीक्षेत ९६५ उमेदवार उत्तीर्ण

By admin | Published: March 07, 2016 2:25 AM

प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रिक्षा परवाने वाटपासाठी प्रथमच घेतलेल्या मराठी भाषेच्या मौखिक चाचणीची प्रक्रि या नुकतीच पूर्ण झाली आहे.

पनवेल : प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रिक्षा परवाने वाटपासाठी प्रथमच घेतलेल्या मराठी भाषेच्या मौखिक चाचणीची प्रक्रि या नुकतीच पूर्ण झाली आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कळंबोली याठिकाणी घेण्यात आलेल्या या परीक्षेला एकूण १११६ उमेदवार लॉटरी पध्दतीने उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी ९६५ उमेदवार या परीक्षेला हजर राहिले होते. मराठी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ९६५ जण यशस्वी झाले, तर १० उमेदवार मराठी वाचता येत नसल्याने अनुत्तीर्ण झाले. परीक्षा घेण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चोख उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ४ टेबलवर एक परिवहन अधिकारी, एका मराठी पत्रकाराची नियुक्ती करण्यात आली होती. ६ दिवस चाललेल्या या परीक्षेसाठी रोज १८६ उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. पनवेल प्रादेशिक परिवहन विभागामार्फत इरादापत्र देताना आकारलेल्या शुल्कापोटी शासनाच्या तिजोरीत सुमारे १ कोटी ५४ लाख ८० हजार रु पयांची भर पडली आहे. मात्र मुलाखतीला हजर न राहणाऱ्यांना पुन्हा बोलवण्यात येणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे. जे अर्जदार उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी सोमवार ७ मार्चला सकाळी १० वाजता कागद पत्रांसह कळंबोली येथील लोखंड व पोलाद बाजारजवळील हॉल क्र मांक २ जवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.परिवहनमार्फत २०१६ मध्ये एक लाख नवीन परिमट वाटप कार्यक्रम जाहीर झाल्यावर ७ जानेवारीपर्यंत आॅनलॉइन पद्धतीने अर्ज मागवले होते. तर १२ जानेवारीला ड्रॉ काढला. या वेळी पनवेल आरटीओ विभागातील १११६ जणांना परवान्याची लॉटरी लागली. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार ते शनिवार असे सहा दिवस पारदर्शक पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी आॅन दी स्पॉट इरादापत्र देण्यात आले. सहा दिवसांत ९६५ जणांना इरादापत्रांचे वाटप केले आहे. यासाठी परवाना शुल्क १ हजार आणि अतिरिक्त १५ हजार असे १६ हजाररु पये प्रत्येक उमेदवाराकडून घेण्यात आले. सहा दिवसांत १ कोटी ५४ लाख ८० हजार रु पये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. (प्रतिनिधी)