शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मुंबई उपनगरी लोकलमधून पडून प्रवासी जखमी; सकाळची घटना

By जितेंद्र कालेकर | Published: January 25, 2024 6:03 PM

दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

ठाणे: कल्याण ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेमधून पडून आकाश एकोकुमार पांडे (२४, रा. खर्डी गाव, ठाणे) हा प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.१० वाजण्याच्या दरम्यान दिवा रेल्वे स्थानकाजवळ घडली. त्याच्यावर कळव्यातील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

ठाण्याच्या सुभाषनगर येिथील टाटा कॅपिटल या खासगी कंपनीमध्ये आकाश नोकरीला असून तो खर्डी गावात वास्तव्याला आहे. दिवा रेल्वे स्थानकातून २५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ३ मिनिटांच्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तो शिरला. जागा नसल्यामुळे तो दरवाजाजवळच उभा होता. रेल्वे काही अंतरावर गेल्यानंतर ४०/२३३-ए आणि १३६ या किलो मीटर अंतराच्या दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान तो लोकलमधून खाली पडला. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने दिवा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याला दाखल केले. त्याची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

टॅग्स :localलोकलthaneठाणे