शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

कॅन्सरचा बाऊ न करता डाॅक्टरकडून रुग्णसेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 12:09 AM

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात डाॅक्टरांसह वैद्यकीय साहित्याची कमतरता लक्षात घेऊन डाॅ. राठोड यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले

ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात डाॅक्टरांसह वैद्यकीय साहित्याची कमतरता लक्षात घेऊन डाॅ. राठोड यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलेनिळजेत लसीकरण माेहिमेत सहभागी

सुरेश लोखंडे

ठाणे : सध्याच्या कोरोना संसर्गाचा काळ भल्याभल्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या संवेदनशील काळात कल्याण तालुक्यातील निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. रमेश राठोड यांनी  कर्करोगावर मात करून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासह रुग्णसेवा सुरूच ठेवली आहे. वडिलांच्या स्मृतीदिनाच्या खर्चाची रक्कम रुग्णांचे चहापान, अल्पोपाहारावर खर्च केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात डाॅक्टरांसह वैद्यकीय साहित्याची कमतरता लक्षात घेऊन डाॅ. राठोड यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले.  वडील हभप नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचा निधी आरोग्य केंद्रातील रुग्ण व लसीकरणास येणाऱ्या ग्रामस्थांचे दैनंदिन चहापाणी व अल्पोपाहारावर खर्च करून समाधान मिळत असल्याचे त्यांनी व त्यांचे स्नेही डाॅ. अविनाश भागवत यांनी सांगितले. यात बीड येथील त्यांची प्राध्यापक बहीण डॉ. ललिता राठोड यांनीही साथ दिली. वडिलांच्या पुण्यतिथीचा गावाकडील कार्यक्रम रद्द करून त्याची रक्कम त्यांनी डॉ. राठोड यांच्याकडे सुपुर्द करीत ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत खारीचा वाटा उचलला. डाॅ. राठोड लातूर जिल्ह्यातील उजनी तांडा (ता.औसा) येथील भूमिपुत्र आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या या आरोग्य केंद्रावर गावपाड्यांचेे ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर आदींना डॉ. राठोड यांच्या सेवेचा लाभ मिळत आहे. त्यांच्या या उपक्रमाला कल्याण येथील मुथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश मुथा, स्थानिक नगरसेवक रवी म्हात्रे, लालचंद भोईर, निळजे येथील प्रकाश पाटील, कल्याण रनर्स सचिन सालीयन यांची मदत मिळाली असल्याचे डाॅ. राठोड सांगतात. 

वडिलांच्या समाजसेवेचा वारसा जपला!ठाणे : लातूर जिल्ह्यातील उजनी तांड्याजवळील एकंबी तांडा येथील हभप नामदेव महाराज म्हणजेच नामदेव जगन्नाथ राठोड यांचे ४७ वर्षांपूर्वीच देहावसान झाले. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य अलौकिक होते. या कार्याची येथील ग्रामस्थांनी दखल घेऊन लोकसहभागातून एकंबी गावात नामदेव महाराजांचे मंदिर बांधले. प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीला गावातील सर्व भाविक व ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला जातो.

टॅग्स :thaneठाणे