शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के, उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:45 AM

आयुक्तांच्या प्रयत्नांना यश : उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी

उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर, मृत्युदर हा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.उल्हासनगरमध्ये लॉकडाऊनकाळात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन ती संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली. त्याचा आरोग्य सुविधेवर ताण पडला. महापालिकेच्या आरोग्य विभागाला नागरिकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यावर केबिन आयुक्त असल्याचा आरोप झाला. मात्र, आयुक्तांनी सर्वपक्षीय नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना विश्वासात घेऊन विविध उपाययोजना राबवत एक आराखडा तयार केला. अखेर, आयुक्तांच्या प्रयत्नांना यश येऊन पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त झाले. तसेच शहरातील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला.

एकूण रुग्णांपैकी पाच हजार ५४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, आजपर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला. एक हजार १५७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त ८० रुग्णांना तीव्र स्वरूपाचा त्रास होत आहे. तर, २६५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून २४७ रुग्णांना कोणताही त्रास व लक्षणे नाहीत. नागरिक घराबाहेर कमी पडल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होईल, अशी प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली.कोरोना रुग्णांच्या जेवणाकडे लक्षकोरोना रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी महापालिका प्रशासन रुग्णांच्या जेवणाकडे विशेष लक्ष देत असल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. दोन वेळा गरम चहा, नाश्ता, जेवण, एक वेळ अंडे, फळे, दूध असे जेवण दिले जात आहे. सकस आहार दिला जात असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे