मुरबाड : कोरोना काळात सरकारी यंत्रणा एका बाजूला प्रयत्न करत असताना दुसरीकडे मुरबाड तालुक्यातील डॉक्टर नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच रुग्णांची लूट करत असल्याचे दिसून येत आहे. शिवळे, सरळगाव, म्हसा, धसई परिसरातील खासगी डाॅक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सरकारी दवाखान्यात अपुऱ्या असलेल्या सुविधा याचा फायदा खासगी डॉक्टर घेत असून हे फक्त रुग्णांची लूट करत आहेत. त्यांच्याकडे सॅनिटायझर, बसण्याची व्यवस्था, किंवा प्रतीक्षाकक्ष नाही. छोट्याशा खोलीत किमान दहा बेड ठेवून उपचार केले जातात. काही डाॅक्टर हे कोणतीही पदवी नसताना आलेल्या रुग्णांवर उपचार करतात.
---------------------------------------------------
कोट
खासगी डॉक्टर उपचार करत असलेल्या ठिकाणी मी स्वत: वेळोवेळी भेटी देत असतो. त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासंबंधी तसेच केवळ एकच बेड ठेवण्याच्या सूचना देत आहे. ते जर आरोग्य विभागाच्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी