लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : किडनीच्या विकारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांनी कोविडकाळात स्वत:ला फार जपायला हवे. कारण अशा रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती आधीच कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली, तर त्याचा त्यांना खूप त्रास होतो. कोरोनाला सामोरे जाताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असे किडनी विकारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पथ्य-पाणी व औषधोपचार केल्यास रुग्ण बरे होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांना उच्च क्षमतेची औषधे दिली जातात. त्यामुळे त्यांना बरे झाल्यावर देखील काही दिवस अशक्तपणा आल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी खूप काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर योग्य आहार न घेतल्यास त्यांना त्रास होऊ शकतो. किडनीचे विकारही होण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनी विकार असलेल्यांनी तसेच जे कोरोनामुक्त झाले आहेत, अशांनी भरपूर काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.
-----------
केडीएमसी हद्दीतील कोरोनाचे एकूण रुग्ण - १,३४,७७८
बरे झालेले रुग्ण - १,३०,९१६
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १,३९९
एकूण मृत्यू - ११२७
-------------------
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...
- रुग्णांनी घाबरून न जाता योग्य काळजी घ्यावी.
- तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर कोणतीही औषधे घेऊ नये.
- शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे.
--------------
फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच घ्या स्टेरॉइड
- किडनी विकारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपच्चार तसेच स्टेरॉइड घेतले पाहिजेत.
- स्वत:हून कोणतीही जास्त, कमी क्षमता असलेली औषध घेऊ नयेत. तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधे बदलून दुसरी घेणे अथवा थेट स्वत:हून घेणे बंदही करू नयेत.
- त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजेत. चांगल्या रुग्णालयात ॲडमिट होऊन तातडीने उपचार सुरू करणे गरजेचे आहे.
----------------
हे करा
- सतत हात धुवा.
- मास्क घाला.
- गर्दीत टाळा.
- नियमित औषध, उपचार घेणे.
---------------------
हे करू नका
- लग्न समारंभ, गर्दीचा प्रवास टाळणे.
- स्वतःहून औषध घेणे.
- डॉक्टरांचे म्हणणे न ऐकणे.
-----------------
कोट
किडनी विकाराच्या रुग्णांनी कोरोना झाल्यास खूप काळजी घ्यायला हवी. त्यांना दुहेरी धोका होऊ शकतो. आधीच त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. वेळीच तज्ज्ञ डॉक्टर अथवा आधीपासून किडनीचे उपचार सुरू असलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करावेत. कोरोना झाला तरी घाबरू नये. हे रुग्णही बरे होतात, फक्त त्यांनी १४ ऐवजी आणखी जास्त दिवस आयसोलेशन असेल किंवा क्वारंटाइन होणे महत्त्वाचे असते.
- डॉ. संदीप भोसले, प्रख्यात नेफ्रोलॉजीस्ट, कल्याण
-------------------