भिवंडी : लोकसभा निवडणुकीत पाटील यांना पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण झाले नसले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते. काही विरोधकांनी पाटील यांच्या गावाजवळील काही ठिकाणी विरोधाचे वातावरण निर्माण केले, तर काहींनी बंडाचे निशाण फडकवले. त्यामुळे शहरासह तालुका ढवळून निघाला. हे लोण संपूर्ण मतदारसंघात पसरल्याने या निवडणुकीला खरी रंगत आली होती. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी काँग्रेसमध्येही उमेदवारी मिळवण्यापासून स्पर्धा झाली. या स्पर्धकांनी दिल्ली गाठून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या पक्षातही पालिकेतील काही नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले. मागील निवडणुकीतील उमेदवार विश्वनाथ पाटील यांना काँग्रेस वरिष्ठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली. मात्र, ही वाट धरताना कुणबी समाजासाठी मागण्या करून आश्वासन पदरात पाडून घेतले. परिणामी, काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा एक लाख नऊ हजार मतांनी पराभव करून भाजपचे पाटील निवडून आले होते. आता काँग्रेस उमेदवार टावरे यांचा पराभव करून पाटील हे एक लाख ५५ हजार मतांनी निवडून आले. मागील निवडणुकीत मतदारांची संख्या १६ लाख होती. ती या निवडणुकीत १८ लाख झाली. दोन लाख नवीन मतदार निर्माण झाले. दीड लाखाने मतदान वाढले होते. या दीड लाखापैकी एक लाख १२ हजार मते पाटील यांना वाढलेली दिसून येतात. टावरे यांना ६५ हजार मते वाढली. वास्तविक, हा मतदार या निवडणुकीचा निर्णायक घटक ठरला आहे.भिवंडी हे मुस्लिमबहुल असल्याने या ठिकाणी काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम या दोन मतदारसंघांतून काँग्रेसला अपेक्षित मतदान झाले नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला भिवंडी पूर्वमध्ये ५९ हजार ३९४, तर यावेळी ७० हजार ८२५ मतदान झाले. भिवंडी पश्चिममध्ये ६१ हजार ८९५ मतदान झाले होते. यावेळी ७८ हजार ३७६ मतदान झाले. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने २७०० मते, तर वंचित बहुजन आघाडीला ५१ हजारांची मते मिळाल्याने मतांचे काही प्रमाणात विभाजन झाले.विशेष म्हणजे पाटील यांच्याविरोधात काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या बंडाचा फायदा आपल्याला होईल, या अपेक्षेमध्ये असलेल्या टावरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली.>भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीनंतर भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा एक लाख ५५ हजारांनी विजय झाला आणि काँगे्रसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा पराभव झाला. मोदीलाट नसताना हा विजय झाला, तरी या विजयावर मोदींचा प्रभाव आहेच.>भिवंडी लोकसभा २०१४मतदारसंघ भाजप काँग्रेसभिवंडी ग्रामीण ८५,५४२ ४२,४७३शहापूर ५३,२७० ४९,८०९भिवंडी पश्चिम ४२,३९८ ६१,८९५भिवंडी पूर्व ४०,१०३ ५९,३९४कल्याण पश्चिम ९७,०१७ ३५,६३५मुरबाड ९२,४२२ ५२,२४६>भिवंडी लोकसभा २०१९ंमतदारसंघ भाजप काँग्रेसभिवंडी ग्रामीण १,१५,५६१ ५३,६६९शहापूर ६७,९०७ ५३,५२०भिवंडी पश्चिम ५२,८५६ ७८,३७६भिवंडी पूर्व ४७,०१८ ७०,८२५कल्याण पश्चिम १,१७,४४० ४९,३०५मुरबाड १,२५,२५० ६०,८९६
पाटील यांची ४६ हजार मते वाढलीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:47 AM