डोंबिवली : लॉकडाऊनमुळे रखडलेल्या कल्याण येथील पत्रीपुलाच्या कामाला पुन्हा वेग आला आहे. या पुलाचे सर्व साहित्य पुढील १० दिवसांत हैदराबाद येथून कल्याणला येणार आहे. त्यामुळे आॅगस्टमध्ये हा पूल वाहनचालकांसाठी खुला होण्याची शक्यता असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.शिंदे यांनी बुधवारी पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांना कामासंदर्भात योग्य ते निर्देश दिले. पुलाच्या कामासाठी कुशल मजुरांची आवश्यकता असल्याने कंत्राटदाराने पश्चिम बंगालमधून मजूर आणले आहेत.पुलाच्या स्तंभाचे काम पूर्ण झाले असून, या पुलाच्या ७६ मीटर लांबीच्या गाळाचे लॉचिंग करण्याकरिता आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच गाळ्याचे कामही हैदराबाद येथे पूर्ण झाले असून, सर्व साहित्य पुढील १० दिवसांमध्ये कल्याणला येणार आहे. त्यामुळे जुलैपासून लॉचिंग प्रक्रिया पूर्ण करून आॅगस्टअखेर पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.‘तिसºया पुलाचे काम जुलैपासून’या ठिकाणी तिसºया पत्रीपुलाचे कामही जुलैपासून सुरू होत आहे. या पुलाचे आवश्यक नकाशे व संकल्पना अंतिम झाले आहे. या पुलाचे काम वर्षभरात पूर्ण होईल, असा दावा शिंदे यांनी केला.
पत्रीपूल ऑगस्टमध्ये होणार खुला?; खासदारांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:34 AM