शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

‘पॉज’ने वाचविले तब्बल ३,४७७ वन्यजीवांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 12:07 AM

२० वर्षांतील कामगिरी; वन्यजीव टिकले तर, अन्नसाखळी राहील

कल्याण : प्राणी व पक्ष्यांसाठीच्या प्लॅण्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीने (पॉज) २० वर्षांत तीन हजार ४७७ वन्यजीवांचे प्राण वाचविले आहेत. वन्यजीव टिकले तर अन्नसाखळी अबाधित राहील, याकडे संस्थेचे प्रमुख निलेश भणगे यांनी लक्ष वेधले आहे.२ ते ९ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर भणगे म्हणाले, कुठे विहिरीत मांजर पडले, घोरपड आढळली, पक्ष्याच्या गळ्यात मांजा अडकला किंवा मोर जखमी झाल्यास संस्थेकडे फोन येतात. मग, आम्ही घटनास्थळी पोहोचून त्यांना वाचवतो. २० वर्षांत एक हजार ६१ साप, दोन हजार २६७ पक्षी, १३ माकडे, तीन कोल्हे, ६० कासव, ३१ विविध प्रजातींमधील सरपटणारे प्राणी, ज्यात घोरपड, सरडे, २० खारुताई, वटवाघूळ, विंचू अशा तीन हजार ४७७ प्राण्यांची सुटका केली आहे. जखमींवर उपचारही केले आहेत.ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातून सर्वात जास्त पक्षी ‘पॉज’कडे पुनर्वसनासाठी येतात. फ्लेमिंगो, चातक, तीनबोटी खंड्या असे स्थलांतरित व दुर्मीळ पक्ष्यांचेही संस्थेने पुनर्वसन केले आहे. विविध बदके, बगळे, सागरी ससाणे, कावळे, चिमण्या, कबुतर, मैना, घार, कोकिळा तसेच लवबर्ड, टर्की आफ्रिकन पोपट यांचेही प्राण वाचवले आहेत. पक्ष्यांच्या लहान पिलांना पुनर्वसन उपक्रमात तात्पुरते पालक दिले जातात. संस्थेच्या सदस्य शिल्पा हरकरे या पक्ष्यांना जेवण भरवितात. पकडलेले सर्प पुन्हा निसर्गात सोडले जातात.दरम्यान, जखमी प्राण्यांवर संस्थेच्या मुरबाड येथील रुग्णालयात उपचार केले जातात. तसेच ‘पॉज’कडे बरीच साधने असून, ती स्कॉटलॅण्ड, इंग्लंड, अमेरिका येथून आयात केली आहेत. संस्थेने सर्पमित्रांची सभा, सर्प संमेलन घेऊन सर्पविषयक माहिती संकलित केली आहे.थायलंडमधील पक्षिगणनेत सहभागसंस्थेकडे ४० छायाचित्रकारांनी टिपलेल्या वन्यजीव व निसर्गाच्या ३०० छायाचित्रांचा संग्रह आहे. भणगे यांनी स्वत: अंदमान निकोबार ते नेपाळ, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, हाँगकाँग येथे छायाचित्रण केले आहे. थायलंडमधील पक्षिगणनेतही त्यांनी सहभाग घेतला आहे.हत्तींसंदर्भात अहवाल सादरभणगे यांनी २००५ पासून पाळीव हत्तींवर संशोधन केले आहे. महाराष्ट्र व गोव्यातील पाळीव हत्तींचा अभ्यास करून न्यायालयात अहवाल सादर केला आहे. तसेच सर्कशीतील १२ सिंह, दोन वाघांची सुटका करून आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने त्यांना बाणोर घाटात सोडले आहे.