डोंबिवली- होळी मध्ये पुरण पोळी प्रसाद म्हणून टाकण्याची पद्धत जुनीच. ह्या प्रथेला काही सो कॉल्ड वैज्ञानिक मंडळी विरोध करत आहेत. त्यांचा मते पुरण पोळी गरिबांना दान केली जावी. ह्या संकल्पनेतून 'PAWS फॉर हुमन्स' ह्या संस्थेने गेल्या वर्षीपासून पुरण पोळ्या वाटप कार्यक्रम सुरू केला. ह्या कार्यक्रमा अंतर्गत, संस्थेचे कार्यकर्ते पवन, ग्लेन, साधना आणि निलेश ह्यांनी ह्या वर्षी सुमारे 150 पुरण पोळ्यांचे वाटप केले. R K वृद्धाश्रम, मानपाडा, डोंबिवली ईथे भेट देऊन पुरण पोळ्या वाटप केले. तसेच वृद्धाश्रम साठी बेडशीट्स, कपडे, फ्रुइट्स चे वाटप केले.जननी आशिष अनाथालय येथे जाऊन पुरण पोळ्या वाटप केले. रंगपंचमी निमित्त drawing बुक आणि स्केच पेन गिफ्ट केले.सिनियर सिटीझन्स च्या क्लब ला भेट देऊन पुरण पोळ्या वाटल्या.शिव मंदिर आणि गणपती मंदिर येथ पोळी वाटप केले. होळी जवळ ठेवल्या बॉक्स मध्ये पोळ्या न टाकता स्वतःच दान करा. होळी जवळ बॉक्स ठेवले असतील त्यात रस्त्यावर चा कचरा गोळा करून टाका. इको फ्रेंडली होलिका दहन होईल.संध्याकाळी होळी मध्ये पोळी अर्पण करणार असल्याचे निलेश भणगे ह्यांनी सांगितले.