डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेला विविध करांपोटी ६३० नागरिकांनी दिलेले तब्बल १७ कोटी ३७ लाख १२ हजार ९३५ रुपयांचे चेक बाउन्स झाले आहेत. या रकमेवरील व्याज मिळून १९ कोटींची करवसुली थकली आहे. याबाबतचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि महापौर विनीता राणे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. चेक न वटल्याने या नागरिकांना दंडाची रक्कम भरावी लागणार असल्याचे आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले.महापालिका आधीच आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. त्यातच, २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत ६३० नागरिकांनी दिलेले चेक बाउन्स झाल्याचे उघडकीस आले आहे.‘अ’ प्रभागातील १२४ नागरिकांनी सात कोटी ४७ लाख २८ हजार ७२५ रुपये, ‘ब’ प्रभागात १२२ करदात्यांनी सहा कोटी १९ लाख एक हजार ६९ रुपये, ‘क’ प्रभागात ८२ करदात्यांनी एक कोटी ४४ लाख सहा हजार ३२३ रुपये, ‘ड’ प्रभागातील १५१ करदात्यांनी एक कोटी ३४ लाख ५३ हजार १३ रुपये, ‘ई’ प्रभागातील ४५ करदात्यांनी एक कोटी ७४ लाख आठ हजार ३२ रुपये, ‘फ’ प्रभागात ४५ करदात्यांनी ४९ लाख ४८ हजार २१० रुपये, ‘ग’ प्रभागात १५ करदात्यांनी आठ लाख ५८ हजार ८४७ रुपये, ‘ह’ प्रभागात ३३ करदात्यांनी ५५ लाख ११ हजार २०८ रुपये, ‘आय’ प्रभागातील १२ करदात्यांनी एक लाख १७ हजार २४८ रुपये, तर ‘जे’ प्रभागात केवळ एका करदात्याने २६० रुपये, असे एकूण ६३० करदात्यांनी महापालिकेला १७ कोटी ३७ लाख १२ हजार ९३५ रुपयांचे चेक दिले होते. मात्र, ते न वटल्याने या रकमेच्या वसुलीचा मोठा पेच महापालिकेसमोर आहे.यासंदर्भात बोडके म्हणाले की, चेक बाउन्स झाले हे वृत्त खरे आहे. तपशीलवार माहिती घेण्यासंदर्भात संबंधित अधिकाºयांसमवेत चर्चा करणार आहे. चेक बाउन्स झाल्याने संबंधित करदात्यांकडून दंड वसूल केला जाणार आहे, तर संबंधित करदात्यांकडून पुन्हा करवसुलीसाठी महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना केली आहे, याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांशी चर्चा केली जाईल,असे महापौर विनीता राणे यांनी सांगितले.चेक बाउन्स झाल्यानंतर पुन्हा करवसुलीसाठी केडीएमसी प्रशासन मोहीम राबवत नाही. या प्रकरणातील कामचुकार अधिकाºयांवर कारवाई करण्याची सत्ताधाºयांची मानसिकता नाही. प्रशासन आणि सत्ताधाºयांची ही मिलीभगत असल्याचे स्पष्ट होत आहे. - मंदार हळबे, विरोधी पक्षनेते, केडीएमसी
चेक बाउन्स करणाऱ्या ६३० जणांना ठोठावणार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 2:09 AM