स्टार १०२७
अनिकेत घमंडी : लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महावितरण कंपनीच्या वीज बिलाचा भरणा चेकद्वारे करणाऱ्या ग्राहकांना आता सतर्क राहावे लागणार आहे. कोणत्याही कारणाने चेक बाउन्स झाल्यास ८८५ रुपयांचा दंड ग्राहकांना भरावा लागणार आहे. त्याचबरोबर पुढील सहा महिने संबंधित ग्राहकाला चेकद्वारे वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
अनेक ग्राहक चेकद्वारे वीज बिल भरतात. मात्र, चेक बाउन्स होण्याचे प्रकार वाढल्याने त्याला आळा बसावा, यासाठी महावितरणने कडक नियम अमलात आणले आहेत. चेक बाउन्स झालेल्या ग्राहकांना यापुढे प्रत्येक वीज बिलासाठी ७५० रुपये बँक ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५ रुपये, असे एकूण ८८५ रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीज बिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहेत.
कल्याण परिमंडळ कार्यालय १ अंतर्गत येणाऱ्या शहरी भागात जुलैमध्ये ४५ लाख ९० हजार रुपयांचे वीज बिलाचे २३७ चेक बाउन्स झाले आहेत, तसेच मंडळ कार्यालय २ मध्ये ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा समावेश होत असून, तेथे जुलैमध्ये ५१ लाख ६४ हजार रुपयांच्या वीज बिलापोटीचे ४०९ चेक बाउन्स झाले आहेत.
-------------
- कल्याण मंडळ कार्यालय १ - कल्याण, डोंबिवली शहरी भागातील वीज ग्राहक
ग्राहकांचे प्रकार - ग्राहकांची संख्या
घरगुती - ०५,८५,८७६
औद्योगिक - ०३,६७४
व्यावसायिक - ५५,४४२
कृषी - ५६
एकूण - ०६,४८,०७५
-------------------------
- थकीत वीज देयके
प्रकार - ग्राहकांची संख्या - थकीत रुपये
घरगुती - १,४२,६५१- ३०,०५,००,०००
औद्योगिक - १,६७४ - १३,५९,००,०००
व्यावसायिक - २२,७२९ - ९,९५,००,००
---------------
- जुलैमधील ऑनलाइन पेमेंट केलेले ग्राहक - ३,५४,३०६ (५४.६७ टक्के)
- ऑनलाइनद्वारे भरलेली वीज देयकाची रक्कम - ६६,६७,००,००० रुपये
- सर्व वर्गवारीतील एकूण १,६८,१२१ ग्राहकांकडे ५५,३४,००,००० रुपये थकीत
- जुलैमध्ये ४५,९०,००० रुपयांचे वीज बिल भरण्यासाठी दिलेले २३७ चेक बाउन्स
-----------
- कल्याण मंडळ कार्यालय-२ बदलापूर, मुरबाड, शहापूर, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ व जिल्ह्यांतील ग्रामीण भाग
ग्राहकांचे प्रकार - ग्राहकांची संख्या
घरगुती - ५,४१,८७१
औद्योगिक - १२,९१५
व्यावसायिक - ६८,५२०
कृषी - ४,८६५
एकूण - ६,३२,१६१
-----------------
थकीत देयके
प्रकार - ग्राहकांची संख्या - थकीत रुपये
घरगुती - २,०२,२७३ - ६७,९७,००,०००
औद्योगिक - ०५,९६०- १८,१४,००,०००
व्यावसायिक - ३७,२७५- २१,००,००,०००
----------–
- जुलैमधील ऑनलाइन पेमेंट केलेले ग्राहक - २,८४,८६८ (४५ टक्के)
- ऑनलाइनद्वारे भरलेली वीज देयकाची रक्कम - ५९,६५,००,००० रुपये
- सर्व वर्गवारीतील एकूण २,४८,९४० ग्राहकांकडे २०६ कोटी ४० लाख रुपये थकीत
- जुलैमध्ये ५१,६४,००० रुपयांच्या वीज बिलापोटी दिलेले ४०९ चेक बाउन्स
--------
कोट :
चेक बाउन्स झाल्यानंतर पुढील सहा महिने संबंधित ग्राहकाला चेकद्वारे वीज बिल भरण्याची सुविधा मिळणार नाही.
- विजयसिंह दूधभाते, विभागीय जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कल्याण
-----------