ठाणे : सदोष एसीची विक्री करून ग्राहकाला त्रुटीची सेवा देणाऱ्या सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक प्रा.लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने पाच हजाराचा दंड सुनावला आहे.नालासोपारा येथे राहणारे सौरभ मिश्रा यांनी सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिकमधून २८ हजाराचा एअर कंडिशनर एप्रिल २०१२ मध्ये विकत घेतला. इन्स्टॉल केल्यापासून तो व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांनी तो बदलून देण्याची मागणी सॅमसंगकडे केली. त्यानंतर सॅमसंगच्या प्रतिनिधीने त्यात लिकेज प्रॉब्लेम सांगितला. त्याच्या दुरूस्तीचे २७६० रूपये घेतले. मात्र त्यानंतरही लिकेज प्रॉब्लेम सुरू होता. सौरभ यांनी ईमेलद्वारे याची तक्रार सॅमसंगकडे केली. लेखीपत्रही दिले. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने सौरभ यांनी अखेर मंचाकडे तक्रार दाखल केली.कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी केली असता १९ एप्रिल २०१२ ला सौरभ यांनी सॅमसंगचा एअर कंडिशनर विकत घेतल्याची पावती मंचात आहे. तसेच २७ आॅगस्टला कॉपर पाईपकरिता २७६० रूपये चार्ज भरल्याची पावतीही आहे. त्यानंतरही लिकेज होत असल्याने ५ डिसेंबरला सौरभ यांनी कंपनीला मेल केला. नादुरूस्त एअर कंडिशनरची विक्री करून सॅमसंगने सौरभ यांना अयोग्य सेवा दिल्याचे मंचाने स्पष्ट केले.
सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिकला दंड
By admin | Published: October 11, 2016 2:55 AM