मीरारोड - वन्यजीव सप्ताहानिमित्त भाईंदरच्या उत्तन भागातील ग्रामस्थ व तरुणांनी कांदळवनात भ्रमंती करत विविध प्रजातींच्या पक्ष्यांची ओळख करून घेतली. शासनाच्या कांदळवन विभागाने भ्रमंतीचे आयोजन केले होते.
कांदळवन वनपरिक्षेत्र अधीकारी भिवंडी - ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन प्रतिष्ठान ठाणेचे उपजिवीका तज्ञ व प्रकल्प सहयोगी यांनी पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती या कार्यक्रमाचे आयोजन ५ ऑक्टोबर रोजी केले होते.
वन्यजीव सप्ताह निमीत्ताने भाईंदरच्या उत्तन गावचे ग्रामस्थ व युवक उत्साहाने या भ्रमंतीमध्ये सहभागी झाले होते. कांदळवन प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी कांदळवनांमध्ये आढळणाऱ्या विविध पक्षांची ओळख ग्रामस्थांना करून दिली. विविध प्रजातींचे पक्षी, त्यांची नावे जाणून घेतली. कांदळवनांचे त्यांच्या गावाप्रतिचे महत्व पटवून देत कांदळवनांच्या विविध प्रजातींची ओळख व त्यांचे गुणधर्म समजावून सांगितले. उत्तन गावच्या ग्रामस्थांनी कांदळवनांबाबत आम्ही सजग राहून त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी पुढाकार घेवू, असे आश्वसन दिले.