शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात येण्याची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 6:23 AM

ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाच्या कूटनीतीला धक्का देत सेनेत बस्तान मांडणाºया प्रेमनाथ पाटील व शरद पाटील या विद्यमान नगरसेवकांना परत आणण्यासाठी थेट नेते

भार्इंदर : ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाच्या कूटनीतीला धक्का देत सेनेत बस्तान मांडणाºया प्रेमनाथ पाटील व शरद पाटील या विद्यमान नगरसेवकांना परत आणण्यासाठी थेट नेते मंडळींच्या विनवण्या होऊ लागल्या आहेत.दोन्ही पाटील यांनी मात्र विनंतीचा सन्मान राखत भाजपात परत येण्यास स्पष्ट नकार दिल्याने पक्षाच्या वरिष्ठपातळीवर अस्वस्थता पसरली आहे. २०१२ मध्ये मनसेतून बाहेर पडत प्रेमनाथ यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता. पूर्वीच्या प्रभाग १० मध्ये प्रेमनाथ यांचे कार्य नागरिकांमध्ये रुजले. त्याला स्थानिक नेतृत्वानेही सकारात्मक साथ दिली. परंतु, स्थानिक नेतृत्वाच्या निकटवर्तीयांकडून प्रभागात स्वपक्षाची अब्रू वेशीला टांगणे सुरू झाल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रेमनाथ यांची राजकीय वाट अडचणीची ठरू लागली. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाच्या आदल्या रात्रीच शिवसेनेत बस्तान हलवले. सेनेनेही प्रेमनाथ यांच्यासाठी त्वरित तडजोड केल्याने भाजपाला हा पहिला धक्का बसला.यानंतर सध्याच्या प्रभाग ५ मधून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व गटनेते शरद पाटील हे दावेदार असताना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना अंधारात ठेवून त्यांचे प्रभाग ५ मधील तिकीट कापण्यात आले. भल्या पहाटे तिकीटवाटप झाल्याने त्याची तसूभरही माहिती पाटील यांना नव्हती. ते उमेदवारी मागण्यासाठी गेले असता तेथे त्यांची मनधरणी करत त्यांचे प्रभाग १८ मध्ये पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. इच्छा नसतानाही शरद यांनी प्रचाराची तयारी सुरू केली असतानाच प्रभाग १८ मधून अगोदरच विजयकुमार राय या इच्छुकाला उमेदवारी दिल्याची बातमी त्यांच्या कानांवर पडली. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शरद यांनी शिवसेनेत उडी घेतली.दोन्ही पाटील यांनी वाचला अन्यायाचा पाढाघडलेला हा प्रकार वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी दोन्ही पाटील यांना भाजपात परत येण्याच्या विनवण्या सुरू केल्या. मात्र, दोघांनी भाजपात न येण्याची इच्छा व्यक्त करून आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीचा पाढा वरिष्ठांपुढे वाचला. त्यावर, तोडगा काढण्याच्या आश्वासनावरही पाटील यांनी नकार दर्शवला. तरीदेखील वरिष्ठांकडून अद्यापही मनधरणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.कंत्राटी प्रचारकांना सुगीचे दिवसयंदाच्या पालिका निवडणुकीत चार पॅनलचा एक प्रभाग असल्याने तो पूर्वीच्या दोन प्रभागांचा मिळून एक प्रभाग झाला आहे. परिणामी एका प्रभागातील लोकसंख्या दुप्पट ते तिप्पट झाल्याने उमेदवारांची प्रचारात दमछाक होते. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी कंत्राटी प्रचारकांची मजुरीवर नियुक्ती करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे ऐन निवडणुकीत कंत्राटी प्रचारकांना सुगीचे दिवस आले आहेत.आधुनिक काळात पक्षप्रचारासाठी थेट कंत्राटी प्रचारकांच्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यंदाच्या मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत यंदाही कंत्राटी प्रचारकांना चांगली मागणी होऊ लागली आहे. हे कंत्राटी प्रचारक प्रभागातीलच असतात. या प्रचारकांना दोन सत्रात प्रचार करायचा असतो.सकाळी ११ पासून दुपारी १ पर्यंत व सायंकाळी ४ पासून रात्री ९ पर्यंत प्रचार करावा लागतो. त्यांच्यासोबत उमेदवाराचेही काही समर्थक व कार्यकर्ते असतात. दिवसाच्या प्रचारासाठी सुमारे १५० ते ३०० रुपये दिले जातात. त्यामुळे प्रसंगी अल्प मजुरीवर काम करणारे कामगार प्रचारक म्हणून हजेरी लावत आहेत. कंत्राटी प्रचारकांमध्ये गृहिणींचा अधिक भरणा आहे.नवमतदारांवर भाजपाचे खास लक्षलोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : राज्यात वर्षभरात झालेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरूण मतदारांनी मोलाची भूमिका बजावल्याचा दावा करत मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतही हाच फॉर्म्युला आजमावण्याची व्यूहरचना भाजपाने आखण्यास सुरूवात केली आहे. त्यात विशेषत: पहिल्यांदा मतदान करणाºया तरुण मतदारांना हेरण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.तरुण यंदाच्या पालिका निवडणुकीत मोठी कमाल करू शकतो, असा अंदाज भाजपाकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तरूण मतदारांसह नवीन मतदार असलेल्या तरुणांना हेरून त्यांना भाजपाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला जात आहे.भाजपाच्या प्रचारादरम्यान त्या तरूण मतदारांना एकत्र आणून त्यांची युुवा संमेलन घेण्याची व्यूहरचना आखली जात असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे.महाविद्यालयात पोहोचवणार पक्षाची विचारधारादुसºया टप्प्यातील प्रचार मोहीमेतंर्गत युवा संमेलनाच्या धर्तीवर तरूणांची राजकारणाविषयीची मते, त्यांच्या राजकीय व्यवस्थेकडून असलेल्या अपेक्षा, शिक्षण आणि रोजगाराविषयीच्या मागण्या यावर चर्चा आणि परिसंवाद होणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसºया टप्प्यातील प्रचार मोहीमेतंर्गत युवा संमेलनाच्या धर्तीवर तरूणांची राजकारणाविषयीची मते, त्यांच्या राजकीय व्यवस्थेकडून असलेल्या अपेक्षा, शिक्षण आणि रोजगाराविषयीच्या मागण्या यावर चर्चा आणि परिसंवाद होणार असल्याचे सांगितले जात आहे.याशिवाय परिसरातील महाविद्यालयांमध्येही भाजपाची विचारधारा पोहचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध केला नसून मात्र त्यात युवकांसंबंधित व त्यांच्याशी निगडीत समस्यांचा उहापोह केला असल्याचे समजते.