शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीविरोधात याचिका   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 11:37 PM

Mira Bhayander Municipal Corporation : मीरा-भाईंदर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या सदस्यांच्या निश्चित केलेल्या ५ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या सदस्यांच्या निश्चित केलेल्या ५ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासाठी असणारे निकष व पात्रता डावलून एकाच संवर्गातील उमेदवारांना सदस्यत्व देण्याचा प्रयत्न असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्याने उपस्थित केला आहे.पक्षीय बलानुसार भाजपचे ३ तर शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी १ स्वीकृत सदस्य होणार असताना भाजपकडून ४ जणांचे अर्ज आले होते. भाजपच्या सोहनराज राजपुरोहित यांनी अर्ज मागे घेतल्याने जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले, माजी नगरसेवक भगवती शर्मा व निवृत्त पालिका अधिकारी अजित पाटील, तर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख विक्रमप्रताप सिंह व काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक शफिक खान या पाच जणांचे अर्ज कायम राहिले. यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव ४ डिसेंबरच्या महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या विरोधात भाईंदरमधील रहिवासी नितीन मुणगेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.न्यायालयात याचिका दाखल असल्याने स्वीकृत सदस्य नियुक्ती करू नये, अशी विनंती याचिकाकर्ता आणि त्यांचे वकील ॲड. पृथ्वीराज गोळे यांनी महापालिकेसह आयुक्त, महापौर आदींना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. स्वीकृत सदस्य हा डॉक्टर, वकील, शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, लेखापाल, अभियांत्रिकी पदवीधारक, महापालिकेचा निवृत्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच सामाजिक संघटनेचा पदाधिकारी आदी वर्गवारीतील असायला हवा असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक