ठाणे : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणारे आमदार गोपीचंद पडाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ठाण्यात पडाळकर यांचा निषेध करीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडाळकर यांचे छायाचित्र जाळले.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, बहुजन समाजातील लोकांवर अन्याय केला, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली. त्यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. त्याची पहिली प्रतिक्रिया ठाणे शहरात उमटली. शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि कार्यकर्त्यांनी पडाळकर यांच्या छायाचित्राला जोडे मारुन ते जाळले. यावेळी पडाळकर यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी परांजपे यांनी सांगितले की, शरद पवार यांची देशामध्ये जाणता राजा अशी ओळख आहे. बहुजन समाजातून नेतृत्व घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दलित, आदिवासी, भटके-विमुक्त समाजातील अनेक कार्यकर्त्यांना घडविण्यात आणि त्यांना संविधानिक पदांवर विराजमान करण्यात, मंत्रीपद देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे स्वार्थासाठी वारंवार बेडूक उड्या मारणाऱ्या पडाळकर यांच्या सारख्यांना शरद पवार यांचे महत्व आणि कतृत्व समजणारच नाही. आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी त्यांनी ही टीका केली आहे. ही टीका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहन करणार नाहीत. त्यांनी या विधानाबाबत तत्काळ माफी मागीतली नाही तर आम्ही पडाळकर यांना काळे फासू. तसेच त्यांना ठाण्यात पाय ठेऊन देणार नाही, असा इशाराही परांजपे यांनी दिला.
आणखी बातम्या...
राज्य सरकार कोरोनाच्या लढाईत पूर्णपणे अपयशी ठरलं - प्रवीण दरेकर
"पंडित नेहरू नसते तर चीनचा प्रश्नच निर्माण झाला नसता", भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान
भारताचे मंत्रालय आणि कंपन्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर - रिपोर्ट
46 वर्षांनंतर पहिल्यांदाच PPF वरील व्याजदर होऊ शकतो 7 टक्क्यांपेक्षा कमी!
'मेड इन चायना' नको तर मग 'या' ब्रँडचे खरेदी करू शकता स्मार्टफोन