ठाणे - शहरी भागातील महिलांसह दुरवरुन आलेल्या महिलांसाठी रेस्ट रुममध्येच शौचालय, फिडींग रुम, सॅनटरी नॅपकीन, वेंडीग मशिन आदींसह इतर अत्याधुनिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार शहरातील महत्वाच्या १० स्पॉटवर पिंक अर्बन रेस्ट रुम उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. येत्या १० डिसेंबर पासून या रेस्ट रुम महिलांसाठी उपलब्ध होणार आहेत.शहरी भागात राहणाºया महिलांसह इतर भागातून ठाण्यात येणाºया महिलांसाठी स्टेशन परिसरात अथवा इतर ठिकाणी सोई सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांची कुंचबना होत असते. लहान मुलांना फिडींग करायचे झाले तरी त्यांना गर्दीच्या ठिकाणी ते शक्य होत नाही. त्यामुळे महिलांच्या या अडचणी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने या महिलांसाठी अर्बन रेस्ट रुम उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात शहरातील १० ठिकाणी ही पिंक रेस्ट रुम उभारण्याचे काम सुरु झाले आहे. याचा सर्व खर्च हा ठाणे महापालिकाच करणार आहे. याची निगा आणि देखभाल देखील पालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी होणारा खर्च पालिका याठिकाणी करण्यात येणाºया जाहीरातींच्या माध्यमातून वसुल करणार आहे.त्यानुसार हायटेक अशा पिंक रेस्टरुममध्ये तीन टॉयलेट असणार आहेत. दोन विदेशी पध्दतीचे आणि एक इंडियन पध्दतीच्या शौचालयाचा त्यात समावेश असणार आहे. चाईल्ड रुम, वेटींग रुम, फीडींग रुम, वेडींग मशिन, सॅनटरी नॅपकीन मशिन आदी साहित्य त्यांना येथे उपलब्ध असणार आहे. शिवाय एटीएमची सुविधा पुरविण्याची तयारी देखील पालिकेने केली आहे. तसेच वायफायची सेवा देखील जाणार असून सीसीटीव्ही कॅमेºयांची निगराणी देखील आजूबाजूच्या ठिकाणी असणार आहे.त्यानुसार पहिल्या टप्यात, कोपरी पूर्व येथील श्री मॉशेजवळील हायवेलगत, सॅटीस पुलावर, चेंदणी कोळीवाडी ठाणा कॉलेज जवळ, कळवा स्टेशन, कळवा नाका, कासारवडवली पोलीस स्टेशन, वाघबीळ नाका, मानपाडा, कापुरबावडी, कोलशेत विसर्जन घाट, गावदेवी मैदान जवळ आदींसह तिनहात नाक्याजवळ देखील अशा पध्दतीने रेस्ट रुम उभारण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या १० डिसेंबर पासून ही पिंक रेस्ट रुम महिलांच्या सेवेत रुजु होणार आहेत.
महिलांसाठी पिंक अर्बन रेस्ट रुम १० डिसेंबर पासून सेवेत होणार रुजु, एकाच ठिकाणी मिळणार अनेक सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:48 PM
महिलांसाठी ठाणे महापालिकेमार्फत पिंक अर्बन रेस्ट रुमची संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात शहराच्या मुख्य भागात १० रेस्ट रुम उभारण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देस्टेशन परिसरासह शहराच्या इतर महत्वाच्या भागात असणार रेस्ट रुममहापालिका करणार निगा देखभाल१० डिसेंबरपासून महिलांच्या सेवेत होणार रुजु