शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

पिसवली शाळेतील मुलांनी केली वाईट विचारांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 7:05 PM

जिल्हा परिषद शाळा पिसवली कल्याण येथे नाविन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी वाईट सवयी मुलांना विचारून त्या एका कागदावर लिहून मनातील वाईट विचार व सवयी जाळून होळीचा सण साजरा केला. होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात यामुळे पर्यावरणाची हानी होते.तसेच होळी सण साजरा करतांना सामाजिक भान ठेवले जात नाही.पाणी वाया घालवला जातो. केमिकल मिश्रीत रंग वापरून शारीरिक इजा पोहचवली जाते. हे होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावेत यासाठी पिसवली शाळेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजूबाजूचा कचरा, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी तयार केली.

ठळक मुद्देशाळेच्या आजूबाजूचा कचरा, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी तयार केलीमुख्याध्यापक अजय पाटील यांनी होळी सणाची विज्ञानाशी सांगड घालून माहिती दिली

डोंबिवली: जिल्हा परिषद शाळा पिसवली कल्याण येथे नाविन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी वाईट सवयी मुलांना विचारून त्या एका कागदावर लिहून मनातील वाईट विचार व सवयी जाळून होळीचा सण साजरा केला. होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात यामुळे पर्यावरणाची हानी होते.तसेच होळी सण साजरा करतांना सामाजिक भान ठेवले जात नाही.पाणी वाया घालवला जातो. केमिकल मिश्रीत रंग वापरून शारीरिक इजा पोहचवली जाते. हे होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावेत यासाठी पिसवली शाळेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजूबाजूचा कचरा, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी तयार केली. त्यातच मुलांनी आपल्या मनातील वाईट विचार जाळून होळी उत्सव साजरा केला. यावेळी गावचे माजी सरपंच प्रल्हाद भोईर, शाळा सुधार समीतीचे अध्यक्ष विलास भोईर यांच्या उपस्थितीत मुलींच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.या अगोदर शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी होळी सणाची विज्ञानाशी सांगड घालून माहिती दिली. सविता नवले यांनी इकोफ्रेंडली रंग तयार केले. महेंद्र अढांगळे यांनी पाणी बचतीचे महत्त्व सांगितले. शर्मिला गायकवाड, मंगला अंबेकर, हर्षद खंबायत, कुसुम भंगाळे, लतिका राऊत, स्मिता धबडे, स्मिता कांबळे यांनी मुलांना होळीकेची कथा तसेच या सणाचे महत्त्व आणि इकोफ्रेंडली होळी कशी खेळावी याची माहिती दिली. प्रल्हाद भोईर यांनी शुभेच्छा देऊन पारंपारिक होळीचे समाजातील महत्त्व मुलांना पटवून दिले. विलास भोईर यांनी गावागावात चालणा-या होळीपेक्षा पिसवली शाळेतील आगळया वेगळ्या होळीचे कौतुक केले. झाडे लावा, झाडे जगवा , इकोफ्रेंडली धुळवड हा संदेश यावेळी देण्यात आला. अजय पाटील यांनी नैसर्गिकपणे होळी खेळण्याची शपथ मुलांना दिली. गेली अकरा वर्षे हा नाविन्यपूर्ण पण पारंपारिक होळीचा सण पिसवली शाळेत साजरा केला जात आहे. इयत्ता पहिलीची मुलगी साक्षी शिंदे हिच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.शेवटी नैसर्गिक व कोरडया रंगाने धुळवड साजरी करून मुलांनी, शिक्षक व गावक-यांसोबत आनंद लुटला. या उपक्रमाचे कौतुक गावक-यांनी व अधिका-यांनी केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणzp schoolजिल्हा परिषद शाळाdombivaliडोंबिवली