लोकमत न्युज नेटवर्कठाणे: मुंब्य्रातील बाह्यवळण मार्गावरील खड्ड्यांमुळे राष्टÑीय महामार्ग क्रमांक ४८ वरील रत्याच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरु आहे. ते अपूर्ण असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक येत्या ४ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत या मार्गाावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिली.ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी काढलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, मुंब्रा बायपास रेतीबंदर मार्गावरील रेल्वे पूलावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पनवेल खारेगाव टोलनाका मार्गावरील मोठया वाहनांच्या वाहतूकीला सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदी घातली आहे.मुंब्रा बायपास मार्गावर पनवेल ते ठाणे आणि ठाणे ते पनवेल या मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आधी २९ ते ३१ जुलै २०२१ दरम्यान हा मार्ग बंद ठेवला होता. आता आणखी हे काम लांबल्यामुळे ३१ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीतही ही वाहतूक बंद राहणार आहे. या काळात मुंब्रा येथील वाहतूक महापे ते रबाले, ऐरोली मार्गे पूर्वद्रुतगती मार्गावर आनंदनगर नाका येथे वळविली आहे. तर कल्याण, डोंबिवली, पनवेल, महापेकडून मुंब्रा बायपास मार्गे लहान (चार चाकी) वाहनांना आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना रेतीबंदर रेल्वे पुलावरुन खारेगाव टोलनाक्याकडे प्रवेश दिला आहे. ही अधिसूचना पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, ग्रीन कॉरीडोर आणि आॅक्सिजन गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांसह इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचेही उपायुक्त पाटील यांनी म्हटले आहे.
मुंब्रा रेतीबंदर महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम लांबले: ४ आॅगस्टपर्यंत वाहतूक बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 9:19 PM
मुंब्य्रातील बाह्यवळण मार्गावरील खड्ड्यांमुळे राष्टÑीय महामार्ग क्रमांक ४८ वरील रत्याच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरु आहे. ते अपूर्ण असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक येत्या ४ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
ठळक मुद्देखड्डे दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु