२१ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ठाण्यातील गायमुख जकात नाका येथील घोडबंदरकडून ठाण्याकडे येणारा रोडवर खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. दुर्दैवाने रुग्णालयात दाखल केल्यांनतर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या मृत दुचाकीस्वाराचं नाव मोहम्मद फैजल अल्हाबक्स बाडवाले असं आहे.
MH 04 GY2564 Bajaj Pulsar-220 या दुचाकीचा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख नाका येथे खड्डयामुळे अपघात झाला. ही दुचाकी रशीद जलील अहमद शेख यांच्या मालकीची असून मोहम्मद फैजल अल्हाबक्स बाडवाले या २३ वर्षीय तरुण बजाज पल्सर दुचाकी चालवत होता. त्यावेळी या दुचाकीचा रोडवरील खड्यामुळे बाडवालेचा पडून अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी कासारवडवली पोलीस कर्मचारी रूग्णवाहीकेसह उपस्थित होते. या व्यक्तीला उपचाराकरीता रूग्णवाहीकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल केले असता त्यास मृत घोषीत करण्यात आले. मृत दुचाकीस्वार हा मुंब्रा येथील अमृत नगर परिसरातील वुडसिझा येथे राहणारा होता.