शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

निसर्ग उद्यानाच्या आश्वासनाला मूठमाती, मार्बल उद्योजकांवर अत्यल्प दरात भूखंडाची मेहरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 5:46 AM

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने उस्मा पेट्रोल पंपाजवळील एमआयडीसीच्या भूखंडावर निसर्ग उद्यान उभारण्याच्या आश्वासनाला मूठमाती देत एमआयडीसीने तो भूखंड चार मार्बल उद्योजकांना कमी दरात उपलब्ध करुन दिला आहे.

- मुरलीधर भवार ।डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने उस्मा पेट्रोल पंपाजवळील एमआयडीसीच्या भूखंडावर निसर्ग उद्यान उभारण्याच्या आश्वासनाला मूठमाती देत एमआयडीसीने तो भूखंड चार मार्बल उद्योजकांना कमी दरात उपलब्ध करुन दिला आहे. डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने या निर्णयाला तीव्र विरोध केला असून या भूखंड वाटपाची चौकशी करण्याची मागणी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.निवासी परिसरातील असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा महाडीक, रश्मी येवले यांनी याबाबत तक्रार केली आहे. असोशिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली आहे. २७ गावे व औद्योगिक निवासी परिसर केडीएमसीतून वगळण्यात आला व पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. त्या दरम्यानच्या काळात उस्मा पेट्रोल पंपानजीक असलेल्या या मोकळ््या भूखंडावर कचरा टाकला जात होता. बेकायदेशीर डंपिंग ग्राऊंडला नागरीकांनी तीव्र विरोध केला. पाठपुरावा करुनही प्रश्न सुटत नसल्याने कल्याण बदलापूर कारखानदार संघटनेनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेचा निकाल नागरीकांच्या बाजूने लागला आणि डंपिंग ग्राऊंड बंद झाले. त्या जागेवर निसर्ग उद्यान सुरु करण्याचे गाजर एमआयडीसीने नागरीकांना दाखवले. कामाच्या प्रगतीबाबत माहितीच्या अधिकारात नलावडे यांनी एमआयडीसीकडे विचारणा केली असता हा भूखंड चार मार्बल उद्योजकांना देण्यात येणार आहे. एमआयडीसीच्या भूखंडाचा वाणिज्य दर हा प्रति चौरस मीटर ३९ हजार ७०० रुपये इतका आहे तर औद्योगिक दर १२ हजार ३२० रुपये आहे. वाणिज्य दराने हा भूखंड न देता एमआयडीसीचे अधिकारी औद्योगिक दराने भूखंड देत मार्बल उद्योजकांवर मेहरनजर दाखवत असल्याचा आरोप वेल्फेअर असोसिएशनने केला आहे. एकूण ११ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडापैकी तीन मार्बल उद्योजकांना प्रत्येकी तीन हजार चौरस मीटर व एका उद्योजकास दोन हजार चौरस मीटर भूखंड दिला जाणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी येत्या १५ दिवसात खुलासा केला नाही तर आंदोलन करुन न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.नागरीकांनी केलेले आंदोलन व न्यायालयीन याचिकेनंतर भूखंडावरील बेकायदा डंपिंग ग्राऊंड हटले. तोपर्यंत एमआयडीसी मूग गिळून बसली होता. भूखंड मोकळा होताच त्याच्या व्यवहारासाठी पुढे सरसावली असून लोकांना निसर्ग उद्यानाच्या वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. एमआयडीसीचे हे वर्तन दुटप्पी असल्याने निषेधार्ह आहे. - राजू नलावडे,माहिती अधिकार कार्यकर्ता