शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

डोंबिवली शहरात प्लास्टिक कचरामुक्त मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:31 AM

कचरामुक्तीसाठी प्रयत्न करणाºया अपर्णा कवी यांच्या पुढाकाराने व इनरव्हील क्लबतर्फे प्लास्टिक कचरामुक्त मोहीम राबवली जात आहे

डोंबिवली : कचरामुक्तीसाठी प्रयत्न करणाºया अपर्णा कवी यांच्या पुढाकाराने व इनरव्हील क्लबतर्फे प्लास्टिक कचरामुक्त मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत सर्व प्रकारचा प्लास्टिकचा कचरा रविवार, २१ जानेवारीला एमआयडीसीतील ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी १० ते १२ दरम्यान स्वीकारला जाणार आहे. त्यात २५ स्वयंसेवक व चार संस्थाही कार्यरत आहेत.इनरव्हील क्लबबरोबर रोटरी, रोटरॅक्ट व डोंबिवली मिलापनगर असोसिएशनही या उपक्रमात सहभागी होणार आहे. यापूर्वीही त्यांनी राबवलेल्या उपक्रमात त्यांनी ३८ किलो ई-कचरा, ४३ किलो प्लास्टिकचा कचरा आणि ९ ते १० थर्माकोलच्या शीट मिळाल्या होत्या. या उपक्रमासाठी कवी यांना ओंकार इंटरनॅशनल शाळेत एक जागा मिळाली आहे. या वेळीस ई-कचरा, प्लास्टिक, थर्माकोल, कपडे, चप्पल, बूट आदी कचरा स्वीकारला जाणार आहे.डोंबिवलीतील ऊर्जा फाउंडेशनही प्लास्टिकमुक्तीसाठी कार्यरत आहे. मात्र, त्यांचे कार्य शहरापुरते मर्यादित आहे. त्यामुळे डोंबिवली औद्योगिक वसाहतीत कवी यांनी आपले कार्य सुरू केले आहे. त्याला चार संस्थांची प्रबळ साथ मिळाली. सुरुवातीला २१ स्वयंसेवक होते. रविवारच्या मोहिमेत २५ स्वयंसेवक सहभागी होतील, असा दावा कवी यांनी केला आहे.दर ३० दिवसांनी मोहीमऊर्जा फाउंडेशन दर ४० दिवसांनी प्लास्टिक कचरा गोळा करते, तर कवी यांच्यातर्फे चार संस्था या दर ३० दिवसांनी ही मोहीम राबवणार आहेत. तसेच आठवड्यातील प्रत्येक गुरुवार हा सुक्या कचºयासाठी ठरवून दिला जाणार आहे. ओल्या कचºयासाठी आठवड्यातील इतर दिवस ठरवले जाणार आहेत. कल्याण-डोंबिवी महापालिकेने या उपक्रमाला हातभार लावणे गरजेचे आहे. मात्र, महापालिका पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याचे कारण देते. परंतु, त्याचा सहभाग मिळाल्यास ही मोहीम अधिक प्रभावी होऊ शकते, असा दावा कवी यांनी केला आहे.पहिल्या मोहिमेला ४८ नागरिकांनी प्रतिसाद दिला होता. आता रविवारी, २१ जानेवारीला हा प्रतिसाद अधिक संख्येने वाढण्याची शक्यता आयोजकांनी केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या इतर प्रभागांतही अशी मोहीम घेण्याचा मानस कवी व चारही संस्थांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी