ठाणे : वेतनकरार संपल्यानंतरही नवा वेतनकरार मागील २३ महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे वाढीव वेतनापासून कर्मचारी वंचित आहेत. यामुळे तो त्वरित करावा, यासह इतर मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचा-यांनी कास्ट्राइब या संघटनेच्या माध्यमातून झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी दुपारी ‘ढोल बजाओ, शासन जगाओ’ असे अनोखे आंदोलन केले. दरम्यान, कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाने ठाणे विभागीय नियंत्रक अधिका-यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे ठाणे विभागीय अध्यक्ष हरीश नाहिदे, गुलाब इंगळे आणि चंद्रकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन क रण्यात आले. दर चार वर्षांनी वेतनकरार करण्यात येतो. तो २०१६ मध्ये संपला. तेव्हापासून २३ महिने उलटल्यानंतरही वेतनकरार न झाल्याने वाढीव वेतनापासून कर्मचा-यांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे तो प्रलंबित करार त्वरित व्हावा. मागासवर्गीय कर्मचा-यांवरील अन्याय दूर व्हावा. एसटी महामंडळाचे खाजगीकरण होऊ नये. पदोन्नतीतील आरक्षण विधेयक लोकसभेत पास करावे. लोकसभेत बिल मंजूर करून मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवावे. सामाजिक न्यायाची काळजी घ्यावी, अशा एकूण आठ मागण्यांसाठी आंदोलन करून त्याचे निवेदन ठाणे विभागीय नियंत्रक अविनाश पाटील यांच्याकडे दिले.‘‘कर्मचा-यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ढोल बजाओ, शासन जगाओ आंदोलन राज्यातील प्रत्येक विभागीय कार्यालयात करण्यात आले.’’ - हरीश नाहिदे, अध्यक्ष ठाणे विभागीय, कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटना
विविध मागण्यांसाठी ठाण्यात एसटी कर्मचा-यांचे ढोल बजाओ, शासन जगाओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 7:10 PM
ठाणे : वेतनकरार संपल्यानंतरही नवा वेतनकरार मागील २३ महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे वाढीव वेतनापासून कर्मचारी वंचित आहेत. यामुळे तो त्वरित करावा, यासह इतर मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचा-यांनी कास्ट्राइब या संघटनेच्या माध्यमातून झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी दुपारी ‘ढोल बजाओ, शासन जगाओ’ असे अनोखे आंदोलन केले. दरम्यान, कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाने ठाणे ...
ठळक मुद्देझोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलनशिष्टमंडळाने ठाणे विभागीय नियंत्रक अधिका-यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले