शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

निविदांचा खेळ चाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:41 AM

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला.

कल्याण : कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला. त्यामुळे ती उघडलेली नाही. आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. यावेळी एक कंपनी जरी आली, तरी तिच्याशी वाटाघाटी करून तिला प्रकल्पाचे काम देण्याचा मानस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाने व्यक्त केला आहे. मार्चपासून प्रकल्पाच्या निविदेचा खेळ सुरू असल्याने तिसरा प्रयत्न तरी यशस्वी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.कचºयापासून वीजनिर्मितीसाठी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू हे आग्रही होते. १८ मार्च २०१८ ला या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र, एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, निविदापूर्व बैठकीत ट्रान्सपरंट टीएकएनएम मलेशिया, जिंदाल अर्बन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया पॉवर लिमिटेड, खागा एनर्जी, ग्रीन लॉजिक्स, स्टेफिल नेक्डलॅण्ड, बायो क्लीन सिस्टीम, डेक्कन माइन, इन्फिनिटी या कंपन्यांनी कल्याणमध्ये कचºयापासून वीजनिर्मितीसाठी स्वारस्य दाखवले आहे. महापालिका या प्रकल्पासाठी उंबर्डे येथे जागा देणार होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिका हद्दीतील ५०० मेट्रीक टन घनकचºयावर प्रक्रिया करून त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाच्या मान्यतेने महावितरण कंपनीस दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी केडीएमसीकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळणार नाही. त्यामुळे प्रतियुनिट ५.५० रुपयांनी वीजखरेदी करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. काही अटीशर्तीमुळे एकाही कंपनीने निविदा भरली नाही. त्यामुळे निविदेची पहिला फेरी वाया गेली. महापालिकेने दुसºयांदा निविदा मागवली. ही निविदा मागवताना काही अटीशर्ती शिथिल केल्या, तरीही त्याला एकाच कंपनीकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत आणखी एक महिना जाणार आहे.नेदरलॅण्डशी सामंजस्य करारवेस्ट टू एनर्जी प्रकल्प प्रस्तावित असताना राज्य सरकारने नेदरलॅण्ड सरकारशी पाणी, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत नागरी नियोजनासाठी एकात्मिक दृष्टिकोन तयार व्हावा, याकरिता सामंजस्य करार २३ मे रोजी केला आहे. या कराराची बैठक मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झाली. कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, ठाणे, पिंपरी-चिंडवड, नागपूर, वसई-विरार, मीरा-भार्इंदर महापालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. त्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. नेदरलॅण्डमधील अ‍ॅमस्टरडॅम या शहरात वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प प्रभावीपणे सुरू आहे. त्याची मदत राज्यातील महापालिकांना होणार आहे.