ठाणे : पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा करून पसार झालेल्या नीरव मोदीचा भागीदार तथा त्याचा मामा मेहूल चोक्सी याच्या मालकीच्या ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्या ठाण्यातील एका मॉलमधील ‘जिली’च्या दोन दुकानांमधील दागिन्यांचे मूल्यांकन सोमवारी दिवसभर सुरू होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाºयांसह पंजाब नॅशनल बँकेतील अधिकाºयांच्या उपस्थितीमध्ये मूल्यांकनाचे हे काम सुरू होते. या दोन्ही दुकानांमध्ये सुमारे आठ ते १० कोटींची मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘पीएनबी’ बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ठाण्याच्या ‘विवियाना’ मॉलमधील चोक्सी यांच्या मालकीच्या ‘जिली’ या हिºयाच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरूममधील ‘जिली’च्या काऊंटरवर ईडीच्या मुंबई विभागाचे सहायक संचालक अंजन चंदा यांच्या पथकाने १६ फेब्रुवारी रोजी छापा टाकून ही दोन्ही दुकाने सीलबंद केली.सोमवारी (१९ फेब्रुवारी रोजी) या दुकानांपैकी शॉपर्स स्टॉपमधील जिलीच्या काउंटर्समधील सर्व दागिन्यांचे मूल्यांकन करणारे तज्ज्ञ, धनंजय सिंग आणि नरेश घई या पंचांच्या आणि दुकानातील कर्मचाºयांच्या मदतीने सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत ही पडताळणी सुरू होती. याठिकाणी सुमारे तीन कोटींच्या आसपास हिºयांचे दागिने मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीबाबतचा तपशील तसेच नेमके किती दागिने ताब्यात घेण्यात आले, याची कोणतीही माहिती देण्यास ईडीच्या अधिकाºयांनी इन्कार केला. वेगवेगळ्या ३६ पॅकेट्समध्ये ते जप्त केल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.या पडताळणीनंतर याच मॉलमधील ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्याच ‘जिली’च्या दुकानातही दुपारी ३ ते रात्री उशिरापर्यंत मूल्यांकनाचे काम सुरू होते. सायंकाळी ७ पर्यंत तीन कोटींच्या दागिन्यांची मोजणी पूर्ण झाली होती. त्यानंतरचा तपशील मात्र उपलब्ध होऊ शकला नाही. दोन्ही दुकानांमध्ये किमान आठ ते १० कोटींची मालमत्ता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.माध्यम प्रतिनिधींशी वादईडी आणि पीएनबीच्या अधिकाºयांमार्फत ज्यावेळी जिलीच्या शॉपर्स स्टॉपमधील काउंटर्समधील दागिन्यांचे मूल्यांकन सुरू होते, त्यावेळी ठाणे, मुंबईतील काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी तिथे छायाचित्रणास सुरुवात केली. तेव्हा शॉपर्स स्टॉप ही खासगी मालमत्ता असून याठिकाणी कोणीही चित्रण करू नये, असे येथील सुरक्षा अधिकारी माध्यम प्रतिनिधींना वारंवार बजावत होते.असे करताना तेथील अधिकाºयांनी प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींशी वादही घालण्याचा प्रकार घडला. तर, ‘जिली’ या दुकानाबाहेरून कोणी छायाचित्रण करू नये, म्हणून सुरक्षारक्षकांनी त्याठिकाणी दुकान पूर्णपणे झाकले जाईल, अशा पद्धतीने पांढºया कपड्यांचे लोखंडी बॅरिकेड्स तयार केले होते. त्यामुळे याठिकाणी नेमके काय घडले, हे पाहण्यासाठी मॉलमधील ग्राहकांनीही दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी केली होती.
पीएनबी घोटाळा; आठ ते दहा कोटींची ठाण्यातील मालमत्ता जप्त, तीन कोटींच्या आसपास हि-याचे दागिने मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 6:17 AM