ठाणे : राष्ट्रीय शिक्षक संचेतनातर्फे देण्यात येणाऱ्या डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वश्रेष्ठ शिक्षक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने ठाणे येथील ज्येष्ठ कवी, लेखक, समाजसेवक प्रा. बाळासाहेब तोरस्कर यांना प्रीतमलाल दुआ सभागृह, कला विथिका, इंदूर, मध्य प्रदेश येथे रविवारी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बृजकिशोर शर्मा, ज्येष्ठ विधिज्ञ अनिल त्रिवेदी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामलाल प्रजापती, महासचिव डाॅ. प्रभू चौधरी, हिंदी परिवार इंदूरचे अध्यक्ष हरेराम वाजपेयी, विशेष अतिथी डाॅ. विमलकुमार जैन, तसेच योगाचार्या डाॅ. निशा जोशी, उपाध्यक्ष डॉ. जी. डी. अग्रवाल, आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय शिक्षक संचेतना व हिंदी परिवार इंदूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने व संस्थेच्या ११ व्या वर्धापनदिन तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित श्रेष्ठ शिक्षक संचेतना सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आठ राज्यांतून पाच शिक्षकांना सर्वश्रेष्ठ शिक्षक सन्मान व २५ शिक्षकांना श्रेष्ठ शिक्षक सन्मानाने गौरविण्यात आले.
..........
कॅप्शन
बृजकिशोर शर्मा व ज्येष्ठ विधिज्ञ अनिल त्रिवेदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. बाळासाहेब तोरस्कर. सोबत रामलाल प्रजापती तसेच महासचिव डाॅ. प्रभू चौधरी.
--------------