ठाणे : नौपाड्यातील विष्णूनगर येथे पाणीपुरवठा विभागामार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जुनी जलवाहिनी पोकलेनचा धक्का लागून सोमवारी सकाळी फुटली. यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुपारच्या सुमारास कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातील नौपाडा परिसरातील विष्णूनगर येथे ठामपा पाणीपुरवठा विभागामार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी पोकलेनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. हे काम सुरू असताना पोकलेनचा धक्का भूमिगत असलेल्या दहा इंचाच्या जुन्या जलवाहिनीला बसला आणि ती सोमवारी सकाळच्या सुमारास फुटली. मात्र, ती पाणीपुरवठ्याची वेळ नसल्याने लागलीच तो प्रकार लक्षात आला नाही. एक तासाने पाणीपुरवठा सुरू झाल्यावर जुनी जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आले. मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांना नाहक पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. परंतु दुपारच्या सुमारास त्या परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी दिले गेले.
..........
वाचली