खासदारांशी पोलिसांची अरेरावी; श्रमिक ट्रेन रद्द केल्याबद्दल विचारला होता जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:41 AM2020-05-28T00:41:44+5:302020-05-28T00:41:49+5:30
मास्कमुळे नेमके कोण आहे, हे ओळखणे अवघड असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ठाणे : परराज्यांतील मजुरांना ठाणे रेल्वेस्थानकात बोलवल्यानंतर केरळ येथे जाणारी श्रमिक ट्रेन अचानक रद्द करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे ठाणे रेल्वेस्थानकात दाखल झाले. यावेळी त्यांच्याशी पोलिसांची अरेरावी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याचे वृत्तांकन करणाºया पत्रकारांनाही महिला अधिकाºयाने दमदाटी केली. दरम्यान, रेल्वे पोलिसांचे नियमानुसारच काम सुरू होते.
मास्कमुळे नेमके कोण आहे, हे ओळखणे अवघड असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे. ठाण्यातून मंगळवारी केरळ आणि वाराणसीला श्रमिक ट्रेन सोडण्यात येणार होती. रात्रीचे १० वाजले तरी रेल्वे येत नसल्याने चौकशी करण्यासाठी खा. विचारे हे रेल्वेस्थानकात आले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गाडीची व्यवस्था केली. मात्र, गाडीमध्ये प्रचंड घाण असल्याने एका प्रवाशाने त्याचे शूटिंग करण्याचा प्रयत्न केला.
तसेच, याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व खासदार राजन विचारे यांनी याबाबत विचारणा केली असता, येथे उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस अधिकाºयाने खासदारांशीच उद्धट भाष्य केले.याशिवाय, सुमारे चार ते पाच तास प्रवासी ताटकळत असतानाही वाराणसीला जाणारी गाडी अचानक रद्द करण्यात आली. याबाबत, पुन्हा विचारणा केली असता सदर महिला पोलीस अधिकाºयाने पुन्हा अरेरावी केली. दरम्यान, पत्रकारांना चक्क रेल्वेस्थानकाबाहेर पिटाळून लावले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने पोलीस अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र ठाणे पोलीस आयुक्त व मध्य रेल्वेच्या अधिकाºयांना दिले आहे.
केरळचा आडमुठेपणा
केरळसाठी दोन ट्रेन सोडण्यात येणार होत्या. त्यातील एक ट्रेन केरळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द केली. त्यात महाराष्ट्रातून कमी लोक केरळमध्ये यावे, यासाठी पुन्हा आडमुठेपणाच्या धोरणाचा अवलंब केल्यामुळे ६00 लोकांची नावे यादीतून काढल्यानंतर केवळ ४५0 लोकांनाच केरळला जाता आले.
रेल्वे प्रशासने कल्याण-जौनपूर आणि ठाणे-वाराणसी ट्रेन जाणूनबुजून रद्द केल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करीत आहे. महिला रेल्वे अधिकाºयांनी केलेल्या सभ्य वर्तणुकीबाबत समज दिली आहे, असे खा. विचारे यांनी सांगितले.