लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याच्या लाल बहाद्दूरी शास्त्री मार्गावरील विजय सेल्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानातून महागडया मोबाईलची चोरी करणा-या तुषार (३०, रा. मुळ गोवा) नामक या मुक बधीर सराईत चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांच्या शोध पथकाने मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती गुुरुवारी दिली. त्याच्याकडून एक लाख २२ हजारांचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.ठाण्यातील टिप टॉप हॉटेलच्या बाजूला असलेल्याय ‘विजय सेल्स’ या दुकानात ३० जून २०२० रोजी रात्री चोरी झाली होती. चोरटयाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकानाच्या पहिल्या ामजल्यावरील काच फोडून आत शिरकाव केला होता. या दुकानातून त्याने नामांकित कंपनीचे दोन ेलाख २८ हजारांचे आठ मोबाईल लंपास केले होते. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये १ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता.वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक फड यांच्या पथकाने घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या संशयिताची माहिती मिळाली. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तुषारला ११ जुलै रोजी अटक करण्यात आली. तो मूकबधिर असल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात आणि त्याच्याकडे चौकशी करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ठाण्यातील विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षिकेची मदत घेऊन संवाद कौशल्य साधून तपास पथकाने त्याला ‘बोलते’ केले. तेंव्हा त्याने या गुन्हयाची कबूली दिली. त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्याच्याकडून एक लाख २२ हजारांचे मोबाईल हस्तगत केल्याची माहिती ढोले यांनी दिली.
ठाण्यात विजय सेल्स या दुकानात चोरी करणाऱ्या मूकबधिर सराईत चोरटयास ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 2:55 PM
ठाण्याच्या विजय सेल्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानातून महागडया मोबाईलची चोरी करणाºया तुषार (३०, रा. मुळ गोवा) नामक या मुक बधीर सराईत चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांच्या शोध पथकाने मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती गुुरुवारी दिली. एका विशेष शिक्षिकेची मदत घेऊन पोलिसांनी त्याला ‘बोलते’ केले.
ठळक मुद्दे विशेष शिक्षिकेच्या मदतीने पोलिसांनी संवाद साधून केले ‘बोलते’एक लाख २२ हजारांचे चार मोबाईल केले हस्तगत