- मेघनाथ विशे पडघा : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे तसेच संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पडघा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. या पोलीस ठाण्यातील कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपल्या निवासस्थानांत राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या निवासस्थानातील प्लास्टर कोसळले होते.काही वर्षांपूर्वी पोलीस कर्मचाºयांसाठी असलेल्या पोलीस लाइनमधील गणेशोत्सव हा पडघ्यातील मानाचा गणपती समजला जायचा. मात्र, पोलीस वसाहतीच्या झालेल्या दुरवस्थेमुळे हळूहळू येथे राहणाºया पोलीस कुटुंबीयांनी दुसरीकडे राहण्यास पसंती दिल्याने २१ खोल्यांपैकी केवळ पाच खोल्यांमध्ये पोलीस कुटुंबे राहत असल्याने हा उत्सवही बंद झाला.गळके छप्पर, वाढलेले गवत, उंदीरघुशींचा त्रास, स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे यामुळे राहणाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी साधी पाहणी करण्याकरिताही येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. यामुळे येथे राहण्यासाठी पोलीस कर्मचारी उदासीन आहेत. विशेष म्हणजे एवढी दुरवस्था असतानाही देखभाल व दुरुस्तीवर वर्षभरात काहीच खर्च झाला नसल्याचे उपअभियंता सचिन धात्रक यांच्याकडून सांगण्यात आले. पोलीस वसाहत व पोलीस ठाण्याची दुरवस्था झालेली इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत उभारली जावी, अशी मागणी काही वर्षांपासून सुरू आहे. गृहखात्याने या मागणीची तातडीने दखल घेऊन नवी इमारत बांधून द्यावी अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली आहे.वसाहतीपेक्षा झोपडपट्टीत राहणे परवडलेपडघा पोलीस ठाण्यामधील एका पोलिसाला आपण वसाहतीत का राहत नाहीत, असे विचारले असता येथे राहण्यापेक्षा झोपडपट्टीत राहिलेले परवडले, अशा शब्दांत त्याने नाव न छापण्याच्या अटीवर संताप व्यक्त केला.निवासस्थानाच्या दुरवस्थेमुळे आमचे कुटुंब जीव धोक्यात घालून राहतो असेही यावेळी सांगण्यात आले. प्रशासनाने त्वरित हालचाल करून आमच्या घरांची दुरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.माझ्या निवासस्थानातील प्लास्टरचा काही भाग कोसळला होता, हे खरे आहे. मुळात पोलीस ठाणे, कर्मचारी व अधिकाºयांचे निवासस्थान हे राहण्याजोगे आहे का, याची पाहणी करून अहवाल सादर करावा, याकरिता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केला आहे.- संजय हजारे, पोलीस निरीक्षकयेथे नवीन इमारत बांधण्यासाठी यापूर्वीच अंदाजपत्रक बनवून मंजुरीसाठी गृहखात्याकडे पाठवले आहे. मंजुरी मिळाली की आम्हाला कामाला सुरूवात करता येईल.- सचिन धात्रक, उपअभियंता
पोलीस वसाहतीची दुरवस्था; पडघ्यातील विदारक परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:45 PM