डोंबिवली : घरात घुसून १९ वर्षांच्या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिची हत्या करणा-या दीपक भणगे (२९) याला रामनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कल्याण न्यायालयाने बुधवारी दीपकला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सुनीलनगर परिसरात ऐश्वर्या देशपांडे (१९) आईसोबत राहत होती. सोमवारी ऐश्वर्याची आई नोकरीला गेली होती. त्यावेळी, दीपक खारीचे पिलू शोधण्याच्या बहाण्याने घरात घुसला. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न दीपकने केला. तिने विरोध करत आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरलेल्या दीपकने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.ऐश्वर्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत दीपकला अटक केली.
तरुणीची हत्या करणाऱ्यास पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 5:00 AM