शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

दुरुस्तीच्या नावाखाली ठाण्यातील पोलिसांची व्यायामशाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:28 PM

ठाणे शहर पोलीस वसाहतीमधील व्यायामशाळेचे साहित्य दुरुस्त करण्याच्या नावाखाली सिद्धी हॉल येथील व्यायामशाळा गेल्या दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहे. ही व्यायामशाळा बंद झाल्याने पोलिसांचीही मोठी गैरसोय झाली आहे. ती तातडीने सुरू करण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देकर्मचारी व्यायामापासून वंचितवरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : येथील मुख्य पोस्ट कार्यालयाजवळ असलेल्या ठाणे शहर पोलीस वसाहतीमधील व्यायामशाळेचे साहित्य दुरुस्त करण्याच्या नावाखाली सिद्धी हॉल येथील व्यायामशाळा गेल्या दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहे. पोलीस आणि त्यांच्या पाल्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहावे, या उद्देशाने सुरू झालेली ही व्यायामशाळा बंद झाल्याने पोलिसांचीही मोठी गैरसोय झाली आहे. ती तातडीने सुरू करण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये पोलीस कल्याण निधीतून २००० मध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहासमोरील सिद्धी हॉल येथे ही अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू केली आहे. याठिकाणी व्यायामासाठी अनेक साधनसामग्री ठेवण्यात आली आहे. तिच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दोन पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. याचा फायदा पोलिसांना चांगल्या प्रकारे होत होता. याठिकाणचे काही साहित्य जुने झाल्याने ते नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी व्यायामशाळा बंद ठेवली होती. या साहित्याची दुरुस्ती होऊन ती लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांकडून व्यक्त होत होती. मात्र, ६० दिवस उलटूनही ती सुरू न झाल्याने पोलीस कर्मचाºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.पोलीस कल्याण निधीतून सुरू झालेल्या या व्यायामशाळेच्या दुरुस्तीचे कामही याच निधीतून करता येईल. मात्र, ती अद्याप सुरू झालेली नाही. पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासन विभागातील अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील पोलीस कर्मचा-यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसHealthआरोग्य